बातमी

मुरगूडच्या श्री. व्यापारी पतसंस्थेतर्फै “किया सोनेट ” फोरव्हिलर गाडीचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फै संस्थेचे सभासद डॉ. श्री. दादासो मारूती घाटगे रा. गंगापूर यानां किया सोनेट या फोर व्हिलर गाडीचे वितरण करण्यात आले.

श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. किरण गवाणकर यांच्या शुभहस्ते गाडीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व गाडीची चावी सभासद डॉ. दादासो घाटगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

या गाडीच्या वितरण प्रसंगी संस्थेचे व्हा . चेअरमन श्री . प्रकाश सणगर, संचालक सर्वश्री किशोर पोतदार, साताप्पा पाटील, शशिकांत दरेकर, प्रशांत शहा, धोंडीराम मकानदार, नामदेवराव पाटील , निवासराव कदम, प्रदिप वेसणेकर, संदिप कांबळे, संचालिका सौ. रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव ,कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, संस्थेचे कर्मचारी, सभासद उपास्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *