बातमी

अनैतिक संबंधातून होणाऱ्या वादामुळे महिलेस जबर मारहाण

कागल / प्रतिनिधी : अनैतिक संबंधातून सतत होणाऱ्या वादावर समजावण्यास गेलेल्या महिलेच्या डोक्यात व तोंडावर टॉमीणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये महिला गंभीर जखमी झाली. तिला रस्त्यातच टाकून सर्वांनी पलान केल्याचा प्रकार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राज्य महामार्गावर कागलच्या लक्ष्मी टेकडी येथे घडला आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.

सिद्धेश्वर धोंड राहणार भांडारवाडी जिल्हा उस्मानाबाद असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कागल पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सिद्धेश्वर धोंड याचे फिर्यादी पवार रा- येवलुज, तालुका- पन्हाळा याच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते अनैैतिक संबंधातून पवार व धोंड यांच्यात सातत्याने वाद विवाद व्हायचे. वादावादी समजावून सांगण्याच्या प्रयत्न सदरची महिला करीत होती. यावेळी पवार यांच्या बहिणीच्या डोक्यात व तोंडावर टॉमिणे मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली.

तिला रस्त्यातच टाकून तिथून सर्वांनी फलायन केले. कागल पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. गंभीर जखमी झालेली महिला शुद्धीवर आल्यानंतरच खरा प्रकार उघडकीस येणार आहे. पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर जमादार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *