बातमी

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणात होणारा ३५० वा राज्याभिषेक सोहळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : अतिशय दिमाखदार पद्धतीने संयुक्त गावभाग व शिवप्रेमी मुरगूड यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहा जून रोजी संपन्न होणाऱ्या ३५० वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून रायगड नंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा राज्यभिषेक सोहळा म्हणून गेल्यावर्षीपासून या सोहळ्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे.

या राज्याभिषेक दिनांचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत युवराज सूर्यवंशी आणि पांडुरंग मगदूम यांनी दिली. शिवप्रेमी मुरगूड शहर आणि संयुक्त गावभाग मुरगूड यांच्यावतीने या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.चार जून रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता मदन पलंगे यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम, महिलांसाठी हळदीकुंकू असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पाच जून गडपूजन कार्यक्रमाने राज्याभिषेक सोहळ्यात सुरुवात होणार असून संध्याकाळी आठ वाजता टीव्ही स्टार रेणेके बंधू जागरण गोंधळ पार्टी इचलकरंजी पुजारी मळा व समस्त गोंधळी समाज मुरगूड यांच्यावतीने भवानी गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा जून रोजी सकाळी ग्रामदैवत अंबाबाई मंदिरापासून शिवतीर्थ येथे पालखी सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी ठीक ८ वाजता शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवरायांच्या उत्सव मूर्तीस मंत्रोच्चारांच्या घोषात बारा बलुतेदार यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात येणार आहे

यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कीर्तनकार डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी चार वाजता ग्रामदैवत अंबाबाई मंदिर मुरगूड इथून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी या शोभायात्रेत रणमर्द आखाडा मुरगूड यांच्या वतीने मर्दानी खेळ, माध्याळ येथील लेझीम पथक, आनुर येथील संत गोरा कुंभार झांजपथक, अकलूज येथील हलगी पथक, धनगरी ढोल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सजीव देखावे त्यांची भव्य मूर्ती यांचा समावेश आहे यानंतर संध्याकाळी सात वाजता शिवतीर्थ येथे आनंदसोहळा साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी आतिषबाजी आणि भव्य लेझर शो करण्यात येणार आहे. यावेळी माजी ग्रामविकामंत्री हसनसो मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील बिद्री संचालक प्रविणसिंह पाटील शाहू ग्रुप चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह डॉ. भीष्म सूर्यवंशी, उद्योगपती नवनाथ सातवेकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्वागत राजू चव्हाण यांनी केले तर आभार ओंकार पोतदार यांनी मानले.

या पत्रकार परिषदेस सुशांत मांगोरे, समाधान पोवार (sp) अरुण मेंडके, सर्जेराव भाट, पृथ्वीराज(बाळासाहेब) चव्हाण, अजित कांबळे, सुशांत महाजन, रोहित(सोन्या) मोरबाळे, धीरज गोधडे, गणेश तोडकर, रणजीत मोरबाळे, आकाश इंगळे, आकाश डेळेकर, प्रथमेश कोळी, सुशांत भोसले, सुशांत चौगुले,अनिल रावण, राहुल चौगुले यांच्या सह शिवप्रेमी मुरगूड शहर, नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *