बातमी

स्वराज्य रक्षक स्वामीनिष्ठ वीर शिवाजी काशीद म्हणजे इतिहासातील त्यागाचे पान होय – वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी

मुरगूड (शशी दरेकर) शिवरायां प्रति स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यासाठी प्राणत्याग याचे मुर्तीमंत उदाहरण नरवीर स्वराज्यरक्षक शिवाजी काशीद होय असे उद्‌गार वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी काढले ते मुरगूड येथे नाभिक समाज बांधवांच्या वतिने आयोजित वीर शिवाजी काशीद यांच्या ३६१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. दिग्वीजयसिंह पाटील (मुरगूडकर) हे होते. संजय रणवरे व अनिल रणवरे यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

दिग्वीजयसिंह पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, नेपापूरचे वीर शिवा काशिद यांनी स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान दिले . एक नाभिक समाजातील वीर त्यांची शिवरायांप्रति असणारी निष्ठा बहुजन समाजासाठी प्रेरणादायी अशीच आहे.

स्वागत जोतीराम रणवरे यांनी प्रास्ताविक प्रविण रनवरे यांनी तर आभार सचिन कोरे यांनी मानले. यावेळी सचिन रनवरे, अमोल रनवरे, संजय रनवरे, गुंडा माने, मोहन रनवरे, अथर्व रनवरे, विकास सावंत, राम पवार, आदींसह नाभिक समाज बांधव व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *