व्हनाळी (वार्ताहर) : व्हनाळी ता. कागल येथील श्री कामधेनू ग्रामीण बिगर शेतीसह पतसंस्थेच्या चेअरमनपदी के.बी.वाडकर यांची तर व्हा.चेअरमनपदी सुर्यकांत रामचंद्र मर्दाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. एन. बंडगर यांनी काम पाहिले. यावेळी संचालक एम. टी पोवार, जयसिंग हात्रोटे, रंगराव पाटील, हिंदुराव पाटील, रंगराव दंडवते, बाबुराव पोवार, आनंदी वाडकर, गिता जाधव उपस्थित होते. आभार सचिव सुधाकर हात्रोटे यांनी मानले