सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये झाली प्रसूती
कागल/प्रतिनिधी : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील महिलेने कागल शहरातील सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी दवाखान्यात तिळ्यांना जन्म दिला. या मातेची गुंतागुतीची वैद्यकीय प्रसुती तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. तिळ्यासह मातेची तब्येत ठीक आहे. यावेळी तिला दोन मुली व एक मुलगा ही अपत्ये झाली आहेत. तिन्ही बाळाची व आईची तब्येत स्थीर असल्याचे सिटी प्राइड हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. तुषार भोसले यांनी सांगितले.
स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ. स्मीनल चव्हाण यांनी या महिलेची प्रसुती केली. १५ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास ही प्रस्तुती झाली. सध्या तिन्ही बाळांना बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज आहे. ही अवघड प्रस्तुती सुलभ पूर्ण करण्यासाठी बालरोग तज्ञ- डॉ. तृप्ती भोसले, भूलतज्ञ – डॉ. प्रवीण चव्हाण व ओटी असिस्टंट सूर्यकांत चोपडे व सर्व स्टाफ यांनी प्रयत्न केले.