कागल – सध्या सुरू असलेल्या मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करीत आहेत. रविवारी सायंकाळी कागल शहरातील मुख्य मस्जिदमध्ये जाऊन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांंनी रोजेकरानां खजूर देत उपवास सोडण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
येथील दर्गा हाल मध्ये आयोजित इफ्तार पार्टीत सहभागी झाले. मुस्लीम बांंधवाबरोबर स्नेहभोजनही घेतले व संवाद साधला. यावेळी विविध मान्यवरासह मुस्लीम बांंधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष असिफ मुल्ला व त्यांच्या सहकारयांनी या इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. जेष्ठ कार्यकर्ते बाबगोंड पाटील, शाहु साखर कारखान्याचे संचालक बाॅबी माने, सतीश पाटील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सतीश माने, पोलीस उपनिरिक्षक गच्चे, रमेश ढोणुक्षे, दिपक मगर, राजेंद्र जाधव, युवराज पसारे, पप्पु कुभार, अरूण सोनुले, प्रकाश गुरव, अश्विन नाईक, शिवगोंड पाटील, विलास ढोणे प्रमुख उपस्थितीत होते तर रमीज मुजावर, समीर नायकवडी, बाळासाहेब नाईक, हिदायत नायकवडी, अंजुम नायकवडी, मिरासाहेब शेख, शौकत आगा, शौकत जमादार, अस्लम मकानदार, सैफुल जमादार, सैफ नायकवडी आदी मुस्लीम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.