मुरगूड (शशी दरेकर) : श्रेष्ठता जन्मावर नाही तर कर्मावर अवलंबुन असते यावर गौतम बुद्धांचा ठाम विश्वास होता त्यामुळे गौतम बुद्धांनी मृतीपुजा व चातुवर्ण व्यवस्था नाकारली. अगदी त्याचप्रमाणे शिवरायांनी, शाहु महाराजांनी कर्मकांड मानले नाही जातीव्यवस्था मानली नाही तर सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्यांचा कारभार पाहीला. त्यामुळे शिवरायांचे, शाहुंचे विचार हे बौद्ध धम्माशी सुसंगत आहेत असे मत डॉ सुभाष देसाई यांनी मांडले. ते समाजवादी प्रबोधिनी आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाश्वत विकास चळवळीचे प्रणेते डॉ अर्जून कुंभार होते.
मुरगुड ता.कागल येथे समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला डॉ.आंबेडकरांच्या जयंती निमित्त आयोजित केली जाते. या 34 व्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी जेष्ठ विचारवंत डॉ सुभाष देसाईं यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाचे स्वागत बी.एस.खामकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ अर्जून कुंभार यांनी केले.
……
………..
डॉ.देसाई पुढे म्हणाले,हिंदु धर्माचे अंधानुकरण चालू आहे. सावरकरांचा उदो उदो करून हा देश हिंदुराष्ट्र घोषित करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. यामुळे हा राष्ट्र हिंदु होईल पण अल्पसंख्याकांचे भविष्य तर धोक्यात येणार आहेच शिवाय राज्यघटनेलाही धोका पोहोचणार आहे अशावेळी भारताची राज्यघटना जपणं ही सर्वांची जबाबदारी आहे.
यावेळी दलितमित्र डी.डी.चौगले, एम.टी.सामंत, शंकर कांबळे, भिमराव कांबळे, शशिकांत दरेकर, विकास सावंत, सचिन सुतार, जयवंत हावळ, अविनाश चौगले, विनायक हावळ, प्रकाश तिराळे, राजू चव्हाण(फोटोग्राफर), पी.एस दरेकर, विक्रम पाटील, कृष्णात कांबळे, पांडुरंग पाटील इत्यादी मान्यवर व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचलन विकास सावंत यांनी केले तर आभार समिर कटके यांनी मानले.