बातमी

मुरगूड ( माधवनगर )येथे जुगार अड्डयावर छापा ; १८ जणांवर मुरगुड पोलिसांत गुन्हा दाखल

मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूडमध्ये तीन पानी जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून ५ लाख ९२ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुरगुड येथील माधवनगरजवळील एका तीन पानी जुगार अड्ड्यावर (दि. २२) रोजी-जुगार खेळताना पोलिसांनी १८ जणांना रंगेहाथ पकडले.

यामध्ये चंद्रकांत गोरखनाथ डवरी, जोतीराम भाऊ पाटील, सुनील साताप्पा पाटील (आदमापूर), भिकाजी शिवाजी माने (भडगाव), आनंदा पांडुरंग एकल (वाघापूर) अभिजित पाटील, सातापा बळीराम डेळेकर (मुरगूड), धनाजी बाबुराव पाटील (मुदाळ) केरबा विठ्ठल कळमकर, अजित म्हेतर, धोंडीराम कांबळे (निढोरी), अनिकेत कांबळे, शिवाजी दत्तात्रय कुंभार (बोरवडे), बबन देवेकर (मळगे खुर्द), कृष्णात पाटील, युवराज शिंदे , चंद्रकांत यशवंत पाटील (आदमापूर) व सुहास गोरखनाथ कांबळे (निढोरी) या १८ जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *