बातमी

मुरगूड विद्यालयात १४ पासून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

मुरगूड विद्यालयात भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाला अनुसरून शिक्षण प्रसारक मंडळ मुरगूड संचलित मुरगूड विद्यालय (ज्युनि कॉलेज /हायस्कूल) व पंचायत समिती कागल यांच्या संयुक्त विद्यमानाने ५१ वे कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मुरगूड विद्यालयात केले आहे. १४ ते १६ डिसेंबर अखेर या प्रदर्शना मध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ गणपतराव कमळकर व कार्यवाहक प्राचार्य एस आर पाटील यांनी दिली.

विज्ञान प्रदर्शनासाठी एम आर देसाई विज्ञान मंच व स्वामिनाथन विज्ञान नगरी सज्ज होत आहे.कागल तालुक्यातील सर्वच माध्यमिक व प्राथमिक शाळांतून सुमारे ३५० उपकरणे समाविष्ट होणार आहेत. बुधवार दि.१४ रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उदघाटन माजी आमदार संजय बाबा घाटगे यांचे शुभहस्ते तर माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती मीना शेंडकर ,अनुराधा म्हेत्रे ,आप्पासाहेब माळी आदी उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी पार पडणार असून शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांचे अध्यक्षतेखाली ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी चमत्कार सादरीकरनातून वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर सुनील स्वामी यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी गोकुळ चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, दत्तात्रय खराडे ,मुख्याधिकारी संदीप घार्गे, सपोनि दीपक भांडवलकर उपस्थित राहणार आहेत.

शनिवार दि.१६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे शुभहस्ते व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.यावेळी खासदार संजय मंडलिक जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,पेट्रन सदस्य दौलतराव देसाई,बिद्रीचे संचालक प्रविणसिंह पाटील ,माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार ,शिक्षक नेते दादासाहेब लाड,कोजीमाशीचे चेअरमन बाळ उर्फ लक्ष्मण डेळेकर,संस्था उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत,प्राथमिक बँक संचालक बाळासो निंबाळकर,जि प कर्मचारी सोसायटी संचालक सुनील पाटील,प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रमुख,सर्व शिक्षक पतसंस्था चेअरमन संचालक उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेस शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस.गावडे,सारिका कासोटे, शामराव देसाई,उपमुख्याद्यापक एस.बी.सुर्यवंशी ,उपप्राचार्य एस.पी.पाटील ,पर्यवेक्षक एस.डी.साठे तंत्रप्रमुख पी.बी. लोकरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *