बातमी

कागलचे डॉक्टर तुषार भोसले पुरस्काराने सन्मानित

कागल/ प्रतिनिधी : सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. तुषार भोसले यांच्या निमशहरी भागातील आरोग्य सेवेतील कार्याची दखल घेत, ‘द डॉक्टरप्रेन्युअर अकॅडमी’च्यावतीने त्यांना यावर्षीचा सन्माननीय ‘मिलियन लाईव्ह अवॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारासाठी देशभरातील सुमारे ५००० हून जास्त डॉक्टरांमधून फक्त दोन डॉक्टरांची निवड करण्यात आली होती. यामध्ये सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. तुषार भोसले यांच्या नावाचा समावेश आहे.

कागलसारख्या निमशहरी भागात प्रगत तंत्रज्ञांनासह अत्याधुनिक आरोग्य सुविधा देण्याच्या हेतूने डॉ. तुषार भोसले यांनी 2021 साली सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली. दोन-अडीच वर्षांच्या कालावधीतच ‘रुग्णप्रिय हॉस्पिटल’ असे बिरूद मिळवण्यात हे हॉस्पिटल यशस्वी ठरले. कागल शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णही या हॉस्पिटलला प्रथम प्राधान्य देत आहेत, यावरून सिटी प्राईडच्या जनमान्य रुग्णप्रियतेचा अंदाज येतो.

रुग्णांमध्ये आपुलकी आणि विश्वास निर्माण करण्यात हॉस्पिटलने अभूतपूर्व यश मिळवले आहे. हॉस्पिटलमध्ये सध्या ७ विभाग कार्यरत आहेत. सुसज्ज मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, विभागवार तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांच्या सहाय्याने सिटी प्राईडमध्ये गुंतागुंतीच्या आणि अवघड शस्त्रक्रियाही केल्या जातात. परिसरातील हजारो रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन या हॉस्पिटलने रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.

रविवार, ४ जून रोजी गोवा येथे पार पडलेल्या एका खास सोहळ्यात ‘द डॉक्टरप्रेन्युअर अकॅडमी’चे संस्थापक आणि संचालक, अमित सिंग मोगा आणि डॉ. प्रणव शर्मा यांच्या हस्ते डॉ. तुषार भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी देशभरातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते.

समस्त कागलकरच नव्हे तर कोल्हापूरकरांसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे. कागलसारख्या निमशहरी भागात गेली अडीच वर्षे सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने तळमळीने केलेल्या कामाचा हा यथोचित सन्मान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *