बातमी

छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा मुरगूडमध्ये उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशेवा राज्याभिषेक दिन सोहळा मुरगुड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .मुरगुड शहरांमधील शिवप्रेमी मुरगुड आणि संयुक्त गाव विभाग मुरगुड यांच्यातर्फे तीन दिवस राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून या सोहळ्याची गेल्या वर्षीपासून ओळख निर्माण झाली आहे.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी मुरगूड मधील महिला वर्गासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .त्यानंतर शिवतीर्थ येथे सोहळ्यानिमित्त तोरण अर्पण करण्यात आले .या सोहळ्याच्या आदल्या दिवशी मुरगुड येथील काशिलिंग बिरदेव मंदिर जेथे छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याची इतिहासामध्ये नोंद आहे या ठिकाणी गड पूजन विधी द्वारे सुरुवात करण्यात आली.

यानंतर मशाल ग्रामदैवत अंबाबाई मंदिर येथून शिवतीर्थ येथे आणण्यात आली. यानंतर सुप्रसिद्ध टीव्ही स्टार रवी रेणके बंधू इचलकरंजी यांचा गोंधळ गीताचा कार्यक्रम पार पडला. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात मुरगुड शहरातील तरुणाई नागरिक महिलावर्ग तल्लीन झाले होते. रवी रेणके यांनी तब्बल तीन तास आपल्या सुमधुर आवाजाने मुरगूड मधील नागरिकांना आकर्षित केले होते . यावेळी तरुणांनी मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला तसेच यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली या कार्यक्रमास मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप घार्गे मुरगुड पोलीस स्टेशनचे पीएसआय कुमार ढेरे, राहुल वाघमारे जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, डॉक्टर भीष्म सूर्यवंशी नवनाथ सातवेकर हे प्रमुख उपस्थित होते . रात्री भव्य दिव्य आतिषबाजी करण्यात आली.

राज्याभिषेकच्या मुख्य दिवशी सकाळी ग्रामदैवत अंबाबाई मंदिर येथून भव्य पालखी काढण्यात आली. यामध्ये अश्व हालगी मंगल कलश घेऊन सुवासिनी यांच्यासह बारा बलुतेदार जोडीने उपस्थित होते. यानंतर शिवतीर्थ मुरगुड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्सव मूर्तीस विधिवत अभिषेक घालण्यात आला . बारा बलविदारांच्या हस्ते तसेच मुरगूड मधील आंतरराष्ट्रीय कीर्तनकार श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते हा अभिषेक घालण्यात आला. यानंतर दुपारी चार वाजता कोल्हापूरचे खासदार संजय दादा मंडलिक, कागल चे माजी आमदार संजय बाबा घाटगे, गोकुळचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील, गोकुळचे संचालक नावेद मुश्रीफ, युवा नेते दिग्विजयसिंह पाटील या प्रमुख राजकीय व्यक्तींच्या हस्ते चतुर शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीवर पुष्पाभिषेक करण्यात आला.

यानंतर ग्रामदैवत अंबाबाई मंदिर येथून भव्य आणि दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती सईबाई महाराणी साहेब यांच्या वेशभूषा करून त्या घोड्यावर स्वार झाले होते. याचबरोबर हलगीच्या तालावर असणारा अश्व धनगरी ढोल, काही कैचाळ हलगी घुमले, अकलूज येथील प्रसिद्ध हलगी, अनुर येथील झांज पथक माध्यम येथील लेझीम पथक, रणबर्द आखाडा मुरगुड यांच्या वतीने मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज यांच्या सजवलेले ट्रॅक्टर वरती भव्य मूर्ती हजारो नागरिक या शोभायात्रेमध्ये सहभागी होते. यानंतर रात्री साऊंड शो आणि आकर्षक लेझर लाईट शो यामध्ये तरुणाईने बेधुंदपणे नृत्यावर नाचण्याचा आनंद घेतला यामध्ये तरुणीसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. हजारो मुलांच्या गर्दीमध्येही महिला आणि तरुणीनी सुरक्षितपणे नृत्याचा आस्वाद घेतला हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. यानंतर भव्य आणि दिव्य आतिषबाजी करण्यात आली.

या सोहळ्यासाठी गेले महिनाभर मुरगूड शिवप्रेमी आणि संयुक्त गावभाग मुरगुड चे सर्व सदस्य राबत होते. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्यामुळे या सर्व सदस्यांचे कष्टाची चीज झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरगूड पोलीस स्टेशनचे एपीआय विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या संपूर्ण सोहळ्यास हजारो नागरिकांनी तरुणांनी महिलांनी सहभाग नोंदवला. प्रचंड गर्दीचा उच्चांक यावेळी मोडल्याचे संयोजकांनी सांगितले युवराज सूर्यवंशी पांडुरंग मगदूम, राजू चव्हाण, ओंकार पोतदार, सुशांत मांगोरे, समाधान पोवार (sp) अरुण मेंडके, ,सर्जेराव भाट,पृथ्वीराज(बाळासाहेब) चव्हाण,अजित कांबळे,सुशांत महाजन, रोहित(सोन्या) मोरबाळे,धीरज गोधडे,गणेश तोडकर , रणजीत मोरबाळे,आकाश इंगळे, , आकाश डेळेकर, प्रथमेश कोळी, सुशांत भोसले, निलेश चौगुले सुशांत चौगुले,अनिल रावण,राहुल चौगुले या शिवप्रेमी मुरगुड आणि संयुक्त गाव भाग मुरगुड सदस्यांसह शिवप्रेमींनी कार्यक्रमासाठी कष्ट घेतले

फोटो समरजित चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *