मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. समृध्दी सुशांत गवाणकर हिने दहावी परिक्षेत ९७.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून प्रथम आली.
तिला शिवराजचे प्राचार्य पी. डी. माने, उपमुख्याध्यापक एस्. एच. पाटील, शिक्षक प्रविण सूर्यवंशी, अविनाश चौगले, सुपरवायझर एस .बी. भाट, व्ही बी खंदारे, एस. डी. कांबळे, आर ए जालिम सर, बी आर मुसळे, वाय एस पाटील, वडील सुशांत शांताराम गवाणकर, आई सौ. समिक्षा सुशांत गवाणकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले. कु. समृद्धीने प्रथम क्रमांकाचे यश संपादन केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.