बातमी

गर्भपात प्रकरणी कागल पोलिसांनी केली डॉक्टरसह चौघांना अटक

कागल/ प्रतिनिधी : गर्भपात व अनैसर्गिक संभोग याप्रकरणी गर्भपात करणारे डॉक्टर पीडित महिलेचा पती सासू व डॉक्टरांना मदत करणारा सफाई कामगार या चौघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिलेचा पती मुख्तार जमादार सासू यास्मिन जमादार दोघेही राहणार कागल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिग्विजय अभय पाटील, राहणार शनिवार पेठ कोल्हापूर सफाई कामगार राजू केशव चव्हाण राहणार फिजिवडे तालुका राधानगरी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार तारीख 9 ऑक्टोंबर 2023 रोजी कागल पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करून अनैसर्गिक संबंध ठेवून पती सासू यांनी तिला नांदवण्यास नकार दिला.

पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी या प्रकरणाचा तपास केला ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथील डॉक्टर दिग्विजय पाटील यांनी सफाई कामगार राजू चव्हाण यांच्या मदतीने गर्भात केला हा गर्भपात बेकादेशीर त्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे डॉक्टर व सफाईगार यांना रात्री अटक केली आहे तसेच पती व सासू या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे एकूण या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे च्चे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *