कागल(विक्रांत कोरे) : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर भागातील ऊस तोडणी मजुरांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर झाले. यावेळी 500 हून अधिक मजुरांना लसीकरण केले .या शिबिराचे उद्घाटन शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले ओमिक्रोन व कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कारखाना ऊसतोड मजुरांसाठी मोफत कोव्ह्याक्सिंन व कोव्हीशिल्ड या लसीचे पहिला व दुसरा असे दोन्हीही डोस कारखाना कोव्हिड केअर सेंटर मध्ये देण्यात आले.
यावेळी ऊस तोडणी मजुरांना मास्कचे ही वितरण केले तसेच या दोन्ही विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी बाबत मार्गदर्शनही केले. ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षका डॉक्टर सौ सुनिता पाटील, जगन्नाथ खोत तसेच कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी महेंद्र पाटील, सुभाष कांबळे आदी उपस्थित होते.