बातमी

मुरगुड विद्यालया नजीक मंजूर टॉयलेट त्वरित सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा – पांडुरंग पुजारी

मुरगुड ( शशी दरेकर ) – मुरगुड नगरपालिकेकडून मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड जवळ हायटेक टॉयलेट बांधणे हे काम मंजूर झाले आहे . सुमारे 46 लाख रुपये खर्चाच्या किमतीची निविदा पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी आपल्या नगरपालिकेकडून कामाची कोणतीच सुरुवात झालेली नाही.

बाजारपेठ मध्ये एकही टॉयलेट नगरपालिकेचे नाही त्यामुळे येथील व्यापारी लोक नागरिकांना खास करून महिला ंना फार त्रास होत आहे मुरगुड विद्यालयाने असणारे नियोजित टॉयलेट बांधकाम त्वरित सुरू करून पूर्ण करणे गरजेचे आहे.

आठवडा बाजार दिवशी तरी लोक उघड्यावर शौचालयास बसत आहेत . याचा त्रास तेथे राहणाऱ्या नागरिकांना होत आहे संबंधित काम लवकरात लवकर सुरू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मुरगुडच्या तमाम नागरिक व व्यापारी महीला यांच्या वतीने मुख्याधिकारी मुरगुड नगरपरिषद मुरगुड यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

निवेदनाच्या प्रती पैलवान पांडुरंग पुजारी ,यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरपालिकेचे अभियंता प्रकाश पोतदार यांना नुकतीच देण्यात आली.

यावेळी  योगेश वंडकर, अरविंद शिंदे, राजू इंदलकर ,सुरेश कांबळे , युवराज पाटील ,पांडुरंग चव्हाण, अर्जुन गोसावी, सारिका चौगुले ,कोमल लोकरे, संदीप कांबळे, अंजना इंगळे , संदीप मांगले, सचिन रेडेकर, प्रकाश मेघवाल ,शिवाजी भिके आदी -उपस्थित होते व यांच्या सह 80 व्यापारी  महीलांच्या सह्या निवेदनावर देण्यात आल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *