वाचा गहिनीनाथ समाचार ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक ८ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

मुरगूड बाजारपेठेत दिपावली खरेदी साठी ग्राहकांची तोबा गर्दी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथिल दिपावलीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुरगूड बाजारपेठ ग्राहकानी फुलून गेली आहे. मुरगूडमध्ये अनेक ठिकाणी आकाश कंदील, विद्युत रोषणाईच्या माळा , तयार फराळांचे, चिवडा-पोहे, लाडू कळी, कापड दुकाने, तयार कपडयांची दुकाने, किराणा दुकाने आकर्षक विद्युत रोषणाईने सजली आहेत. त्याचबरोबर सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यानीही विविध योजना जाहिर केल्या असून ग्राहक आपल्याकडे … Read more

उद्योजक, नियोक्त्यांनी रोजगार पोर्टल वर माहिती अद्ययावत करावी

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील खाजगी,शासकीय व निमशासकीय आस्थापनांनी महास्वयम वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर आपल्या आस्थापनेचे Registration ID आणि Password नोंदवून लॉगिन करावे. तसेच या प्रोफाईल मध्ये अपूर्ण असलेली माहिती तात्काळ अद्यावत करावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता … Read more

दूधगंगा वेदगंगा कारखाना एफआरपी प्रमाणे प्रतिटन विनाकपात ३२०० रुपये ऊसदर देणार – कार्यकारी संचालक के. एस. चौगले

मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला ‘एफआरपी’ प्रमाणे विनाकपात प्रतिटन ३२०० रुपये दर देण्यात येणार आहे. तसेच उत्पन्न विभागणी सुत्रानुसार होणारी वाढीव रक्कम देणे बाबत नवीन संचालक मंडळ निर्णय घेईल. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली. कारखान्याच्या ६१ … Read more

मुरगुड – आदमापूर – अक्कलकोट एसटीची हिरकणी बस सेवा लवकरच

नवीन सुरु होणाऱ्या बससेवेमुळे प्रवाशी वर्गात समाधान मुरगूड ( शशी दरेकर ) : दिवाळीच्या मुहूर्तावर मुरगुड व पंचक्रोशीतील प्रवासी जनतेच्या मागणीनुसार मुरगूड – आदमापूर- पंढरपूर -अक्कलकोट अशी विविध तीर्थस्थळांची भेट घडवणारी मुरगुड- अक्कलकोट ही बस सेवा एसटीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुरगुड बस स्थानकावरून पहिल्यांदाच एसटीची हिरकणी (एशियाड)नावाची निम- आराम बस सेवा … Read more

मुरगूडच्या शिवराजचा सुमित रेपे राज्यशालेय वुशू स्पर्धेत तृतीय

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा कला शाखेचा विद्यार्थी सुमित जितेंद्र रेपे यांने अमरावतीच्या विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षाखालील वयोगटामध्ये ५२ कि. वजनगटात तृतीय क्रमांक पटकावला. राज्याच्या सर्व विभागातून आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीतून सुमितने हे यश कमावले. … Read more

हायवे पोलिसांच्या त्रासातून वाहनधारकांची मुक्तता करा….!

कागल / प्रतिनिधी : कागल शहरा लगत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी आहे. वळणदार रस्ता आणि चढ आहे. याचा फायदा घेत, हायवे पोलीस वाहनधारकांना बरोबर बकरा करतात. वाहनांच्या अडवणुकीमुळे अनेक वेळा या ठिकाणी दुचाकी स्वारांचे अपघात झालेले आहेत. वाहनधारकांची होणारी अडवणूक व पिळवणूक थांबविण्यात यावी, अशी मागणी कागल तालुक्यातील विविध पक्षांचे अध्यक्षस्थानी कागलचे तहसीलदार … Read more

कागलमध्ये उरुसानिमित्त बैलगाडी शर्यतीना परवानगी नाकारली

कागल प्रतिनिधी : श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरूस मोठ्या प्रमाणात भरवण्याचे नियोजन उरूस कमिटीने केले आहे. यामध्ये विविध कार्यक्रम करण्याचे ठरले आहे. या वर्षी बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणात घेण्याचे नियोजन होते. तथापि, लम्पी या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आणि जनावरांसंबंधित कायद्यान्वये उरुसामध्ये बैलगाडी शर्यती घेण्यास प्रांताधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे यंदा बैलगाडी शर्यती नसल्याने शौकिनांच्या उत्साहावर … Read more

मुदाळतिट्टा येथे मराठा आरक्षण प्रश्नी युवकाचे उपोषण

उपोषणाचा तिसरा दिवस.. तब्बेत खालावली मुरगूड ( शशी दरेकर ) – मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुदाळतिट्टा येथे गेले चार दिवस साखळी उपोषण सुरू आहे. यामध्येच बोरवडे ता. कागल येथील 24 वर्षीय युवक ओंकार सागर चव्हाण याने आमरण उपोषण सुरु केले आहे. ओंकार चव्हाण यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून त्याची … Read more

वंदूर मध्ये मुलाने केला आईचा निर्घृण खून

कागल / प्रतिनिधी : दारूच्या आहारी गेलेल्या लेकाने दारुला पैसै देण्यास आईने नकार दिला.नशेत लेकाने आईचा गळा घोटला. ही घटना कागल तालुक्यातील वंदूर येथील वांईंगडे मळ्यात बुधवारी रात्री उशिरा घडली.संशयीत आरोपी निलेश अशोक वांईंगडे वय वर्ष 30 यास कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीमती सुनिता अशोक वांईंगडे वय वर्ष 51 राहणार वंदूर वाईंगडे मळा असे … Read more

error: Content is protected !!