30/09/2022
0 0
Read Time:2 Minute, 34 Second

मुदाळतिट्टा येथील घटनेने खळबळ

मुरगूड(शशी दरेकर) : आपल्या बहिणीसोबत परगावी चाललेल्या अल्पवयीन मुलीस माझे तुझ्यावर प्रेम आहे.असे म्हणत एस. टी. तून खाली ओढत नेवून मोटरसायकलवर बसवून अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न एका प्रेमवीराने मुदाळतिट्टा येथे केला. गर्दीच्या ठिकाणी एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलीसांनी बसरेवाडी (ता. भुदरगड ) येथील एकतर्फी प्रेमवीर प्रभूनाथ बंडेराव पाटील यास अटक केली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बसरेवाडी ( ता.भुदरगड ) येथील एकतर्फी प्रेमवीर प्रभूनाथ बंडेराव पाटील याचे गावातील एका मुलीवर प्रेम होते. मुलगी आपल्या बहिणीसोबत परगावी जाण्यासाठी मुदाळतिट्टा बसथांब्यावर उभी होती. याचदरम्यान मुरगूड एसटी येताच या दोघी बहिणी बसमध्ये चढू लागल्या होत्या. त्यावेळी संशयीत आरोपी प्रभूनाथ पाटील याने धूमस्टाइलने मोटरसायकल तेथे घेवून येवून त्या मुलीस आय लव्ह यू म्हणत हाताला धरले व माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याबरोबर चल म्हणाला. या दरम्यान त्याने मनाला लज्जा उत्पन्न होइल असे वर्तन केले.

मुलीच्या हाताला धरले व तिला ओढत फरफटत नेल्याने तिच्या हातापायांना खरचटून जखमी झाली. यावेळी सोबत असलेल्या बहिणीने आरडाओरडा करुन त्याला प्रतिकार केला. बहिणीचा अवतार पाहून त्या प्रेमवीराने तेथून पळ काढला. असा अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न एका प्रेमवीराने मुदाळतिट्टा येथे केला. या पीडीत मुलीने बहिणी समवेत मुरगूड पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली आहे. या फिर्यादीनुसार प्रेमवीरास मुरगूड पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास मुरगूड पोलीस करत आहेत.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!