अन्नपुर्णा शुगर केनवडे येथे शिव संपर्क अभियानाअंतर्गत कार्यक्रम, शिवसंपर्क अभियानाला मोठा प्रतिसाद
व्हनाळी (सागर लोहार) : कोरोनाकाळात सपुर्ण जग चक्काजाम झाल्यानंतर कौशल्याने,धाडसाने व नियोजन बद्दरित्या प्रशासन चालवून महाराष्ट्राची धुरा यशस्वीरित्या सांभाळून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला. या देशात ज्यांनी आपल्याकडे कोणतेही खाते घेतले नाही असा एकही मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही परंतू स्वतःकडे एकही खाते न घेणारे देशातील एकमेव मुख्यमंत्री म्हणजे उध्दवजी ठाकरे साहेब आहेत असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी आमदार,अन्नपुर्णा शुगरचे चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी केले.
अन्नपुर्णा शुगर केनवडे ता.कागल येथे शिवसेनेच्या शिव संपर्क अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. स्थानिक लोकाधिकार समिती मुंबई चे स्वप्नील महाडिक,राजन आगवणे,शरद वजे प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी शिवसेनेच्या मुंबई येथून आलेल्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या पदाधिका-यांचा अन्नपुर्णा शुगर कारखान्यामार्फत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वंदूर,सांगाव,कागल,व्हनाळी,केनवडे आदी ठिकाणी शिव संपर्क दौरा करून या समितीने शिवसैनिकांच्या सुचना,विकासकामांचा आढावा जावून घेतला.
शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवण्यासाठी, शिवसेनेनं “शिव संपर्क अभियान” सुरू केलं असल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे यांनी दिली.
तालुकाप्रमुख अशोकराव पाटील,शिवगोंड पाटील,विद्या गिरी यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास सौ.शुभांगी पाटील, दत्ता पाटील,रणजित गायकवाड,बाजीराव पाटील,दिनकर लगारे,उत्तम पाटील,आनंदा खंडागळे,धोंडिराम एकशिंगे,बाळासो सांवत आनंदा तळेकर,चंद्रकांत पाटील, मारूती जाधव धोंडिराम परिट आदी उपस्थीत होते.
स्वागत वैभव आडके यांनी केले आभार बाबुराव शेवाळे यांनी मानले.
निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय….
शिवसेनेमध्ये विविध ठिकाणी निवडी करून शिवसैनिकांचा सन्मान केला आहे. राज्यसभेसाठी जिल्हाप्रमुख संजय पोवार यांना संधी देवून निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम पक्षप्रमुख ,मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी केल्याचे गौरवउदगार माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.