नोकरी

महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत विविध ५३ पदांच्या जागा

पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर कायदेशीर संचालक पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

संचालक (कायदेशीर) पदाच्या जागा

शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा/अनुभव –

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल.

विधी निदेशक पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.

उमेदवारास संबंधित पदाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे परिपूर्ण ज्ञान असेल आणि तो संबंधित कायदयाचे
प्रशिक्षण देण्यास सक्षम असेल.

उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

शासन निर्णय, गृहविभाग, एसपीपी-२००९/९२२/प्र.क्र.१०९/पोल-१०, दि.१८.६.२००९ नुसार विधी निदेशक
पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीचे वेळी ६० वर्षापेक्षा जास्त नसेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि विशेष पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई, पिनकोड- 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिकृत वेबसाईटhttps://www.mahapolice.gov.in/

https://drive.google.com/file/d/1oASxHy3RcxSYxU_ZSZ19coDK0_cFkFh1/view

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *