पिंपळगाव खुर्द(आण्णाप्पा मगदूम) : जुनी पेन्शन ही हक्काची असून अन्य राज्यांनी ही योजना स्वीकारली आहे यामुळे राज्यसरकारने ही योजना लागू करणे ही काळाची गरज आहे असे मत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष विलास पोवार यांनी व्यक्त केले.गेले ९५ दिवस झाले मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक आंदोलनाच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते.पुढे ते म्हणाले २००५ पूर्वी नियुक्त असणारे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांना सरकारने अद्याप जुनी पेन्शन योजना लागू केलेली नाही.पेन्शन सुविधा न घेताच काही कर्मचारी निवृत्त झाले तर काही कर्मचारी मयत झाले तरीही शासनास याचे काहीही देणे घेणे वाटत नाही.
हक्काची पेन्शन मिळवण्यासाठी जे आंदोलक आंदोलन करीत आहे यास महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा पूर्ण पाठींबा राहील. पुढे ते म्हणाले देशातील काही राज्यांनी कर्मचारी वर्गास जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने या कर्मचारी वर्गास जुनी पेन्शन योजना लागू करावी व त्यांचे जीवन सुखकर करावे.यावेळी सर्व आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी जितेंद्र सावंत, भाऊसो बोराटे, भाऊसो खाडे, संदीप गुरव, शिवाजी तिकोडे, राजश्री इंगवले, अश्विनी पोवार, जयश्री वैराट व निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.