ताज्या घडामोडी

KDCC BANK ELECTION RESULTS 2021-22 UPDATE कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुक निकाल

शेती संस्था गट भैय्या माने विजयी क्रांतिसिंह पवार पाटील पराभूत
आजरातून सुधिर देसाई विजय मात्र चर्चा फुटलेल्या मताचीच
भटक्या विमुक्त जाती स्मिता गवळी विजयी

नागरी बँक,पतसंस्था गटात आमदार प्रकाश आवाडे पराभूत, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर विजयी
कोल्हापूर

संपर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत अत्यंत अटीतटीच्या लढतीत नागरी बँका आणि पतसंस्था गटात प्रा. अर्जुन आबिटकर यांनीविजय मिळवला. बँकेचे विद्यमान संचालक अनिल पाटील, आमदार प्रकाश आवाडे पराभूत झाल्याने धक्कादायक विजयाची नोंद झाली आहे.

या गटात विद्यमान संचालक अनिल पाटील, आमदार प्रकाश आवाडे, प्रा. अर्जुन आबिटकर अशी तिरंगी लढत झाली. १२२१ मतदारांपैकी आमदार प्रकाश आवाडे यांना 461मते मिळाली. प्रा. अर्जुन आबिटकरांना 614 तर अनिल पाटील यांना 106 मते मिळाली. आवाडे यांना सत्तारुढ आघाडीत स्थान दिले होते. तर प्रा. आबिटकर हे विरोधी आघाडीतून लढत होते. आबिटकर जिल्हा परिषद सदस्य असून आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू आहेत. अनिल पाटील यांनी मागील निवडणूकीत भाजपकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी सत्तारुढ आघाडीतून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती पण आवाडे यांच्या एंट्रीने अनिल पाटील यांचा पत्ता कट झाला.

खासदार संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील आसुर्लेकर विजयी

भुदरगड मधून रणजितसिंह पाटील व गडहिंग्लज मधून संतोष पाटील विजयी

खासदार संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील आघाडीवर

शिरोळ राजेंद्र यड्रावकर विजयी

विकास सेवा संस्था गटातून पन्हाळा तालुक्यातून श्री.विनय कोरे विजयी

विकास सेवा संस्था गटातून आजरा तालुक्यातून सुधीर देसाई 57 मते घेऊन विजयी अशोक अण्णा चराटी 41 मते……
तीन मते बाद

विकास सेवा संस्था गटातून शाहूवाडी तालुक्यातून रणवीर मानसिंग गायकवाड विजयी

शिरोळ राजेंद्र यड्रावकर आघाडीवर

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूक मतमोजणीला आज शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ वाजता सुरुवात झाली.

मतपेट्या उघडताच त्यात मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या. या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. ‘आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा…आता काय?. सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर पकड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,’ असे मतदारांनी लिहिले आहे.

‘उद्यापासून समरजितदादा सर्वसामान्य लोकांची डोकी फोडण्यासाठी तालुका फिरायला मोकळे’, असे एका चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. तर चक्क एका मतदाराने मतपेटीत टाकलेले पन्नास रुपये मतमोजणीवेळी सापडले. हा विषय मतदान केंद्रावर खूप चर्चेचा ठरला आहे.

कोल्हापूर जिल्हा बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे होत आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीचा पहिला कौल समजणार आहे. बँकेच्या निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ग्रामीण भागात ईर्ष्येने पैजा रंगल्या आहेत.

महिनाभर जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणार्‍या जिल्हा बँक संचालकांच्या 21 जागांपैकी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, माजी आ. अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची निवड बिनविरोध झाली. संस्था गटातील सहा जागांसह 15 जागांसाठी 33 उमेदवारांचे भवितव्य बुधवारी झालेल्या मतदानानंतर मतपेटीत बंद झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *