बातमी

समरजीतसिंह घाटगे यांच्या निषेधात मुश्रीफ समर्थकांचा विराट मोर्चा

कागल : गेल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या तरीखेच्या तिथी वरून आरोप केलापासून कागल मधील वातावरण तापल असून आज समरजीतसिंह घाटगे यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.

समरजीतसिंह घाटगे यांनीराम मंदिर परिसराचा वापर राजकीय कामासाठी केला जातो तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जन्मतारखेवरून बदनामी सुरु केली आहे. याच्या निषेधात कागल पोलीस ठाण्यात समरजीतसिंह घाटगे वर गुन्हा नोंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

सदर मोर्चाची सुरुवात एसटी स्टँड येथून झाली, तो नगरपालिका , राम मंदिर, खर्डेकर चौक असा मुख्य रस्ताने पोलीस ठाण्यजवळ अडवण्यात आला येथे प्रमुख कार्यकर्त्याची भाषणे झाली. यामध्ये निढोरीचे देवानंद पाटील, प्रकाश गाडेकर, प्रताप उर्फ भय्या माने यांची मनोगते झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *