बातमी

निढोरीमध्ये विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : बहुजन समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी भारतीय संविधानाची अंमलबजावणी संविधानातील नियमावलीप्रमाणेच होण्याची गरज आहे. भारतीय संविधानाची योग्य अंमलबजावणी हाच बहुजन समाजाचा जगण्याचा राजमार्ग आहे . असे प्रतिपादन प्रा शशिकांत सावंत यांनी केले.त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच निढोरी ता.कागल आयोजित आंबेडकर जयंती समारंभामध्ये ‘डॉ.आंबेडकर यांचा संघर्षमय वैचारिक प्रवास’ या विषयावर आपल्या व्याख्यानातुन मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत भिकाजीराव मोरबाळे होते.

निढोरी ता.(कागल) येथे 13 व 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात वेगवेगळ्या स्पर्धांच्या साह्याने साजरी करण्यात आली. यामध्‍ये 13 तारखेला भव्य खुल्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक- मयुरी भिमराव कांबळे(गुडाळ )द्वितीय क्रमांक – रोहन रंगराव आदमापुरे(राधानगरी ) तृतीय क्रमांक – विवेकानंद पाटील (भोगावती ) व उत्तेजनार्थ किरण कांबळे (कोळवण ). विजेत्यांना सन्मान चिन्हासह बक्षिसे देण्यात आली. दुसऱ्या दिवशी 14 तारखेला माणगाव येथून आलेल्या भीम ज्योतीचे आगमन व युगपुरुषांच्या जय जयकाराने भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी चार वाजता महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली.

संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक पुनम गोसावी द्वितीय क्रमांक नालंदा कांबळे तृतीय क्रमांक शुभांगी कांबळे. संगीत खुर्ची लहान गट प्रथम क्रमांक पार्थ सातापा कांबळे, द्वितीय क्रमांक सम्यक प्रदीप कांबळे तृतीय क्रमांक कौस्तुभ भिमराव कांबळे यातील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सावंत यांनी केले.तर प्रास्ताविक प्रा.डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले.आभार सतीश कांबळे यांनी मांडले. यामध्ये प्रामुख्याने बिद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुनिलराज सूर्यवंशी,माजी व्हाईस चेअरमन केशव काका पाटील, माजी सरपंच देवानंद दादा पाटील, माजी उपसरपंच विठ्ठल पाटील, वाय एस कांबळे (सर ) साताप्पा कांबळे, शिवाजी कांबळे, दयानंद सागर (सर,) शशिकांत सुतार (सर,)संपत मगदूम,पांडुरंग लोकरे इ.अध्यक्ष,उपाध्यक्ष व कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री विक्रम कांबळे, सुहास कांबळे,भीमराव कांबळे, संजय ल कांबळे,सिद्धार्थ कांबळे, हर्षवर्धन कांबळे,बाबुराव कांबळे, जगन्नाथ कांबळे,रविंद्र कांबळे,संतोष कांबळे,नागसेन कांबळे,ओंकार कांबळे,सुरज कांबळे,धिरज कांबळे, सिद्धेश डवरी यांचे बहुमोल योगदान लाभले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *