बातमी

साहित्यकारांनी समाजात शाश्वत मूल्ये रुजवावीत – आप्पासाहेब खोत

मडिलगे ( जोतिराम पोवार ) : भावी पिढीच्या उद्धारासाठी साहित्य संमेलने ही काळाची गरज असून “साहित्यकारांनी आपल्या साहित्यातून समाजात शाश्वत मूल्ये रुजवावीत”असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकथनकार प्रा.आप्पासाहेब खोत यांनी केले. ते मडिलगे खुर्द ता भुदरगड येथे आयोजित राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलत होते. अक्षरसागर साहित्य मंच,शाश्वत विकास चळवळ आणि ग्रामपंचायत मडिलगे खुर्द, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संमेलन चार सत्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. यावेळी ग्रंथपालखीचे पूजन उद्योजक विनायक राऊत यांच्या हस्ते झाले.ग्रंथदिंडीचे स्वागत ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात केले. पुढे बळीराजासह बैलगाडी, विविध राष्ट्रपुरुषांचा सजीव प्रतिकृतींचा चित्ररथ, ढोल-ताशांच्या गजर, दांडपट्टा प्रात्यक्षिके, शालेय विद्यार्थी व महिलांचे लेझीम पथक, वारकरी सांप्रदायिक मंडळाचा भजनी ठेका, यावेळी महिलांनी पारंपारिक गीते सादर केली. प्रमूख ग्रंथांच्या पालखीची संवाद्य मिरवणूक मडिलगे खुर्द गावच्या प्रवेशद्वारा पासून ते समारंभ स्थळापर्यंत मोठया थाटात पार पडली. समारंभ स्थळी राष्ट्रपुरूषांचे फोटो पूजन आणि दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले.

स्वागत सरपंच गौरी खापरे यांनी तर प्रास्ताविक अक्षर सागर साहित्य मंचचे अध्यक्ष राजन कोनवडेकर शाश्वत विकास चळवकीचे अध्यक्ष प्राचार्यअर्जुन कुंभार यांनी केले. आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार बजरंग (अण्णा) देसाई,राहूल देसाई, नाथाजी पाटील, विनायक राऊत, अप्पासाहेब खोत, अर्जुन आबिटकर, नंदकुमार ढेंगेआदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी कवयित्री सायली खोत- लोकरे यांच्या “सायलीची फुले” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच ग्रंथ पुरस्कार प्राप्त साहित्यिक नंदू साळोखे -इपळाप (कादंबरी), अंकुश गाजरे -सारिपाट (कथासंग्रह),
शिवाजी सातपुते -दखल बेदखल (काव्यसंग्रह),राजेंद्र उगले – थांब ना रे ढगोबा (बालकाव्य),श्रीकांत पाटील -ऊसकोंडी (कादंबरी),दि.बा.पाटील -नोटबंदी (कथासंग्रह),सिराज शिकलगार-गझलनाद (गझलसंग्रह),मालती सेमले-रानपाखरं (बालकाव्य) ,अश्विनी व्हरकट -आठवणींच्या हिंदोळ्यावर, कु. श्रावणी पाटील आजीनं सांगीतलेल्या गोष्टी – (बालसाहित्यिका पुरस्कार) यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

अक्षरसागर साहित्य मंच,शाश्वत विकास चळवळ आणि ग्रामपंचायत मडिलगे खुर्द, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संमेलन चार सत्रात संपन्न

तसेच “मडिलगे भूषण पुरस्कार” बिद्री साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम मगदूम यांना तर “भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार” माजी प्राचार्य जयंत कळके यांना जाहिर करुन मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. दुसऱ्या सत्रात “शाश्वत मूल्ये जोपासण्यात साहित्याची भूमिका” या विषयावर डॉ राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान झाले. यावेळी जालंदर पाटील, शिवाजी होडगे, सुभाष विभुते, दीपक मेंगाणे, सूनील देसाई,एम.डी. रावण, बाळ भोसले आदी उपस्थित होते. साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध कथाकथनकार आप्पासाहेब खोत यांनी “महापूर” आणि दत्ता परीट यांनी “भाकरी” हि कथा सादर केली. या वेळी युवराज देवाळे, शामराव देसाई, गणपती कमळकर, बी एम कासार, माधवराव मांडे, टी. एल. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

चौथ्या सत्रात कवी संमेलन पार पडली कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कवि गोविंद पाटील होते यावेळी, कबीर वराळे, विठ्ठल कुलकर्णी, सायली खोत ,एस के पाटील, बी एन खापरे, दिक्षा गुरव, एन.जी.खापरे, मायकल डिसोजा, अनुष्का गोवेकर, राजन कोनवडेकर स्नेहल कुलकर्णी, पांडूरंग पाटील बा.स.जठार, मा.गो. गुरव, डी.के खापरे, संग्राम मस्कर, शिवाजी सातपुते, सत्यजित जठार, वेदांत जठार, आदीनी कविता वाचन केले. सूत्रसंचालन विक्रम वागरे यांनी केले. साहित्य सम्मेंलनाचे संयोजन सुरेश खोत, डी. व्ही. कुंभार, बी.एस. खापरे, सदाशिव करडे, सुनिल खोत,एन.जी. खापरे, पांडुरंग अकोळकर, राम खापरे, तानाजी खापरे, श्रीकांत चौगुले, अरुण चौगुले, बी.एन. खापरे, जयसिंग मगदूम, के डी अकोळकर, सुखदेव मगदूम, बा.स.जठार, सुदेश सापळे, आदींनी केले आभार डाॅ. मा. ग. गुरव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *