मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सह .पतसंस्थेतर्फे संस्थेच्या मुख्यशाखेच्या सभागृहात श्री . किशोर विष्णूपंत पोतदार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन२०२३ते २०२७या-साला करीता नुकतीच चेअरमनपदी श्री .किशोर पोतदार यांची निवड झाली . त्याबद्दल त्यांचा श्री . व्यापारी नागरी पतसंस्थेमार्फत सत्कार ठेवण्यात आला होता .
श्री . व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर यानीं त्यानां_ फेटा बांधून ,शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सर्व संचालकांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यानां_पेढे भरवून _त्यांचा यथोचित सत्कार केला .व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी सत्काराला उत्तर देतानां पोतदार म्हणाले श्री .लक्ष्मी नारायण पतसंस्थेच्या चेअरमनपदी माझी निवड झाल्याबद्दल माझ्या सहकाऱ्यानीं जो माझा सत्कार आयोजित केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे . कारण मी येथे २४ वर्षे काम केले आहे . या अनुभवातूनच व आपल्या सहकार्यातूनच आणि व्यापारी नागरीमुळे लक्ष्मीनारायणच्या चेअरमनपदापर्यंत पोहचण्याचं बळ मिळालं आहे . लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा पारदर्शक कारभारामुळे ही पतसंस्था नावारूपास आली आहे. जेष्ठ विद्यमान संचालक जवाहर शहा, पुंडलीक डाफळे, अनंत फर्नांडीस यांच्यासह सर्व संचालक , मॅनेंजर नवनाथ डवरी व कार्यतत्पर कर्मचारी वर्गामुळे लक्ष्मीनारायण संस्थेच्या रोपटयाचा मोठा वटवृक्ष केला आहे .
या वटवृक्षाच्या छायेखाली आमच्या सारख्यानां घेतलं आणि माझ्यावर सर्वच संचालकानी विश्वास दाखवून माझी एकमताने चेअरमनपदी निवड केली . त्या विश्वासाचे मी नक्कीच सोनं करून १०० कोटीच्या ठेवीचे उदिष्ठ पूर्ण करण्याचा मनोदय त्यानीं यावेळी व्यक्त केला.
या सत्कार प्रसंगी श्री .व्यापारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर , व्हा . चेअरमन प्रकाश सणगर, संचालक सर्वश्री प्रशांत शहा , साताप्पा पाटील , शशिकांत दरेकर , नामदेवराव पाटील, हाजी धोंडीराम मकानदार , प्रदिप वेसणेकर , निवास कदम , संदीप कांबळे , संचालिका सौ . सुनंदा जाधव, सौ . रोहिणी तांबट , कार्य लक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, कर्मचारी वर्ग उपस्थित होता .