बातमी

साके येथे पाणंद बांधकामाचा शुभारंभ

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष फंडातून 10 लाख निधी मंजूर

व्हनाळी (सागर लोहार) : साके ता.कागल येथील मराठी शाळा ते वाईंगडे-घराळ पाणंद रस्त्यावरील ओढ्यावर आर.सी.सी पाईप टाकून मोहरी बांधणे बांधकाम कामाचा शुभारंभ तालुका संघाचे मा. चेअरमन बाळासाहेब तुरंबे यांचे हस्ते तंटामुक्त अध्यक्ष मारूती निऊंगरे, ज्ञानदेव पाटील, अन्नपुर्णाचे संचालक अशोक पाटील, चंद्रकांत निऊंगरे, युवा नेते किरण पाटील, उपसरपंच निलेश निऊँगरे, सदस्य युवराज पाटील, रविंद्र जाधव, सुजय घराळ यांचे प्रमुख उपस्थीत करण्यात आला.

पावसाळ्यात वाईंगडे पाणंद ओढयावर पाणी आल्याने वाईंगडे वसहात रस्ता बंद होत होता. सदर पाणंद रस्ता,व ओढ्यावर दोन ठिकाणी मोहरी बांधकामासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष फंडातून 10 लाख निधी मंजूर करण्यात आला असून पावसाळ्यापुर्वी काम पुर्ण होणार असल्याची माहिती बाळासाहेब तुरंबे यांनी दिली.

यावेळी परसू वाईंगडे, चंदर काळू निऊंगरे,शामराव पाटील,साताप्पा पाटील ,पा.व्ही.पाटील,आनंदा घऱाळ,सोन्या पाटील,बळवंत वाईंगडे,दगडू पोवार,राहुल गिरी, यशवंत वाईंगडे, आदी उपस्थीत होते. स्वागत सुशांत पाटील यांनी केले आभार काॅट्रॅक्टर अमिर नायकवडी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *