बातमी

मुरगूड विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

कोल्हापूर(सूरज गवाणकर): शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालयाच्या २००२-०३ सालच्या
माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक १५ मे रोजी उत्सहात पार पडला.

२००२-०३ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी बॅचला २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या मेळाव्याचे आयोजन मुरगूड विद्यालयामध्ये केले होते. या मेळाव्यास २००२-०३ सालच्या मुरगूड विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगूड विद्यालय (ज्युनि. कॉलेज) चे प्राचार्य श्री एस. आर. पाटील सर होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री आर. एन. संकपाळ सर व श्री पी. डी. पाटील सर
उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलच्या आठवणी ताज्या केल्या. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित विद्यालयाच्या माजी शिक्षिका सौ. पी. पी. पाटील मॅडम, माजी उपमुख्याध्यापक श्री सी. आर. माळवदे सर, माजी प्राचार्य श्री पी. डी. पाटील सर आणि कार्यक्रमाचे
अध्यक्ष श्री एस. आर. पाटील सर यांनी माजी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी शि. प्र. मंडळ कोल्हापूर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शिवानी देसाई, सचिव श्री जयकुमार देसाई, उपाध्यक्ष श्री शिवाजीराव सावंत, संस्था प्रशासनाधिकारी डॉ. सौ. मंजिरीताई देसाई, पेट्रन कौन्सिल मेम्बर दौलतराव देसाई, कौन्सिल मेम्बर बाळासाहेब डेळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *