बैलगाडी शर्यतशौकिनांची प्रचंड गर्दी
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूडात सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक , मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते ऍड . विरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या बैलगाडी शर्यतीत मुरगुडच्या राणा मांगलेच्या बुलेट छब्या व बाशिंग भवरा या बैलगाडीने प्रथम क्रमांकांच्या सव्वा लाखाच्या रोख बक्षीसासह चषक पटकावला.
सर पिराजीराव तलावा शेजारील माळावर बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बैलगाडी शर्यतीचा थरार कागल , राधानगरी, भुदरगड व सीमा भागातील अलोट गर्दीच्या महासागराच्या साक्षीने अनुभवला . शर्यतीत बक्षीस पटकावणाऱ्या बैलगाड्या अशाः
- ‘अ ‘ गट –
- १ )राणा मांगलेच्या (बुलेट छब्या व बाशिंग भवरा ) १,२५ ,२२८ व चषक
- २) संदीप पाटील (हरण्या व हेलिकॉप्टर बज्या) ७५,२२८ व चषक
- ३) किसन आरेवाडीकर सांगली (बैज्या व छब्या) ५१,२२८ व चषक
- ‘ ब ‘ गट –
- १) अरुण पाटील कौलगे ( वस्या ) (२५ ,२२८ व चषक)
- २) पल्लू आरेवाडी (१५२२८ व चषक)
- ३) नागणे मेजर पोकळी (१०,२२८ व चषक )
यांनी बक्षीसे पटकावली आहेत . शर्यतीत पंच म्हणून अर्जून पाटील, सुखदेव पाटील, आनंदा मांगले, विनायक वंदूरे , गजानन पाटील , बाजीराव पाटील यांनी काम पाहिले.

बैलगाडी शर्यतीचा बक्षीस समारंभ खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाशराव आबिटकर, आमदार राजेश पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे, युवा नेते रोहित आर आर पाटील (तासगांव), अॅड. वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते झाले.
यावेळी नंदकिशोर सुर्यवंशी, अमरसिंह घोरपडे , सुनील सुर्यवंशी, सुनील मगदूम, अतुल जोशी , जयवंत पाटील, दगडू शेणवी, यासह मंडलिक , बिद्री व शाहु साखर कारखान्याचे संचालक, माजी जिप सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, सरपंच यांच्यासह अॅड . विरेंद्र मंडलिक वाढदिवस गौरव समिती व राणाप्रताप क्रीडा मंडळ, गावातील तरुण मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वागत जयसिंग भोसले यांनी प्रास्ताविक अॅड वीरेंद्र मंडलिक यांनी केले . तर शर्यती पार पाडण्यासाठी शिवाजीराव चौगुले, किरण गवाणकर ,दीपक शिंदे राजू भाट, विनायक मुसळे ,सर्जेराव भाट आदींनी परिश्रम घेतले समालोचन व सुत्रसंचालन अविनाश चौगले यांनी केले तर आभार नामदेवराव मेंडके यांनी मानले.