बातमी

मुरगूडच्या अंबाबाई मंदीर परिसर विकासासाठी तीन कोटी निधीस प्रशासकिय मान्यता

”गावतलावाच्या मध्यभागी शंभरफुटी हनुमानाची मूर्ती उभारली जाणार “

मुरगूड ( शशी दरेकर ) : यात्रा स्थळांच्या विकास कार्यक्रमा अंतर्गत  मुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या खास प्रयत्नातून मुरगूड येथिल अंबाबाई मंदीर परिसर विकासासाठी  तीन कोटी निधीस प्रशासकिय मान्यता मिळाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी दिली .

         येथील प्राचीन कालातील अंबाबाईचे मंदीराचा   ५ कोटी खर्चातून  नुकताच जिर्णोध्दार झाला आहे . जानेवारी २०२ ३ मध्ये मुरगूड नगरपरिषद मार्फत राज्यशासनाकडे मंदीर व परिसर विकसित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता . त्याचा माजी खासदार संजय मंडलिक यांनी पाठपुरावा केला होता .त्यास अखेर मंजूरी मिळाल्याचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले .

            एक उत्तम तीर्थक्षेत्र म्हणून मुरगूडचे अंबाबाई मंदीर नावारुपाला येणार आहे . मंजूर निधीतून मंदीर परिसराचे सुशोभीकरण  व शेजारच्या गावतलावचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे . गावतलावाच्या मध्यभागी शंभर फुटी हनुमानाची मूर्ती उभारली जाणार आहे . व परिसरात बगीचा . कारंजे व हायमास्क दिवे लावले जाणार आहेत.  हा परिसर  पर्यटनाचे आकर्षण ठरणार आहे .

         मंजूर तीन कोटीमध्ये राज्य शासनाकडून  २ कोटी २३ लाख  नगरपरिषद व देवस्थान कमिटी यांच्याकडून  ७७ लाख निधीची तरतूद होणार आहे.

          लवकरच अंबाबाई मंदीर परिसर विकास कामास प्रारंभ होणार आहे . निधी मंजूरीसाठी व कामाच्या प्रशासकिय मंजूरीसाठी माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह पालकमंत्री ना हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आबिटकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले . ग्रामदैवत अंबाबाई मंदीर विकास कार्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *