मुरगड (शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथील मुख्य बाजारपेठेतील नागरिकांच्या जिव्हाळ्याची पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था शाखेच्या मुदाळतिट्टा तालुका भुदरगड येथील नूतन इमारतीचे चेअरमन श्री किरण गवाणकर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले यावेळी कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर या उभयतांच्या शुभहस्ते सत्यनारायण पूजा पार पडली.

संस्थेच्या मुख्य इमारती सह सर्व शाखा संगणकीकृत प्रणालीने जोडल्या आहेत .संस्थेकडे आज रोजी १६ कोटी १५ लाख रुपयांच्या ठेवी असून कर्ज ११ कोटी २७ लाख रुपये कर्ज वाटप केले आहे पैकी सोनेतारण कर्ज ६ कोटी २७ लाख वाटप केले आहे. संस्थेने ४ कोटी ४३ लाख इतकी इतरत्र गुंतवणूक केली असून राखीव व इतर निधी १ कोटी २० लाख रुपयांचा आहे तर वसूल भागभांडवल २६ लाख २५ हजार रुपये व खेळते भागभांडवल १७कोटी ६७लाख आहे . संस्थेस प्रतिवर्षी ऑडिट वर्ग अ प्राप्त आहे .
या नूतन कार्यालय उद्धाटन प्रसंगी चेअरमन श्री . किरण गवाणकर , व्हा .चेअरमन सौ . रोहिणी तांबट , संचालक सर्वश्री हाजी .धोंडीबा मकानदार , किशोर पोतदार , प्रशांत शहा , साताप्पा पाटील , शशी दरेकर प्रदिप वेसणेकर, नामदेवराव पाटील , यशवंत परीट , महादेव तांबट , संदीप कांबळे , सुरेश जाधव , प्रकाश सणगर , संचालिका सौ , संगीता-नेसरीकर , कर्मचारी वर्ग उपस्थीत होता, प्रास्ताविक साताप्पा पाटील तर आभार प्रदिप वेसणेकर यानीं मानले .