बातमी

शिंदेवाडीमध्ये शिवसेनेच्या युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिंदेवाडी ता- कागल येथे शिवसेनेच्या युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन अॅड .विरेंद्र मंडलीक यांच्या हस्ते झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ. रामेश्वरी खराडे होत्या. यावेळी अॅड .विरेंद्र मंडलीक म्हणाले, अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी युवा सेनेचे व्यासपीठ उपलब्ध असुन युवकांनी अन्यायाविरूद्ध लढुन समाजाच्या सेवेसाठी कटीबद्ध राहावे. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहीती तळागाळापर्यंत पोचवावी. यावेळी पुंडलिक खराडे, पांडुरंग ढेरे, राहुल खराडे, रवी शिंदे, ओंकार खराडे, सागर शिंदे, संदीप कलकुटकी, शुभम चौगले, विनायक खराडे, नंदू ढेरे, नेताजी शिंदे, विजय शिंदे, विनायक शिंदे, विष्णू मोरबाळे, विलास पोवार, आनंदा कदम, सचिन खराडे, वसंत ढेरे, परशुराम मोरबाळे ,शिवाजी खराडे ,संतोष खराडे, तानाजी खराडे, एकनाथ पोवार, दिलीप शिंदे, पी.बी.खराडे ,उत्तम खराडे, सतीश खराडे, संभाजीराव खराडे, निखिल खराडे, अनिल शिंदे, हरी शिंदे, साताप्पा शिंदे, सुकुमार शिंदे यांच्यासह तरूण वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. स्वागत ग्रामपंचायत सदस्य अजित मोरबाळे यांनी केले. तर बालाजी सहकार ग्रुपचे संस्थापक रवींद्र ढेरे यांनी प्रास्ताविक केले. तर आभार रवींद्र जालिमसर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *