24/09/2022
0 0
Read Time:2 Minute, 49 Second

मुरगूडमध्ये कालवश डॉ एन.डी.पाटील यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) – समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीच्या मुरगूड शाखेच्यावतीने एन.डी.पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक शेतकरी, कष्टकरी, कामकरी यांच्या जीवित हक्कासाठी अव्याहत वैचारिक आणि जमिनीवरील लढा देणारे झुंजार नेतृत्व एन डी पाटील यांचे निधन झाले. मुरगूड ता कागल येथील समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना दलितमित्र डी.डी.चौगुले म्हणाले ,” जातीव्यवस्था व त्यातून निर्माण झालेली वर्ग व्यवस्था लाथाडण्यासाठी आवश्यक वैचारिक बळ निर्माण करण्यासाठी एन डी पाटील आयुष्यभर झटत राहिले. माणसाची मने प्रबोधित करणारे डॉ. एन.डी. पाटील एक न संपणारा विचार स्त्रोत आहेत. महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासह थोर विचारवंत समाज सुधारकांच्या विचाराचा वारसा जोपासणारे व आपल्या अमोघ वाणीतून लाखो तरुण कार्यकर्ते तयार करणारे प्रबोधनकार एन. डी. पाटील महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीतील एक चैतन्यमयी तारा आहेत.

यावेळी समीर कटके यांचेही मनोगत झाले प्रबोधिनीचे अध्यक्ष काँ. बबन बारदेस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले डॉ ‌ एन डी पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देत. त्यांचे मुरगूड शहराशी घनिष्ठ संबंध होते त्यांचे विचार समाजात आम्ही रुजविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, ‌ डाॅ.एन डी. पाटील यांनी वयाच्या ९० व्या वर्षा पर्यंत प्रत्येक आंदोलनात, मोर्चा मध्ये अग्रभागी होते.

अक्षय कांबळे, दत्ता कांबळे, मोहन कांबळे, भिकाजी कांबळे, विक्रम कांबळे, अजित कांबळे, राजू कांबळे, विजय कांबळे उपस्थित होते. समाजवादी प्रबोधिनीच्या मुरगूड शाखेत डॉ. एन डी पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!