कागल (विक्रांत कोरे) : गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून मी सदैव त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करत आहे. सर्वसामान्य गोरगरिबांचे काम मी पहाटे पाच वाजल्यापासून करत आहे. म्हणूनच माझा डीएनए लोकसेवेचाच आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनसो मुश्रीफ यांनी केले.
लिंगनूर दुमाला ता. कागल येथील हनुमान मंदिर येथे बांधकाम कामगार साहित्य , आबा कार्ड, घरकुल वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील हे होते.
मुश्रीफ पुढे म्हणाले, माझ्याकडे येणाऱ्यांना मी सदैव मदत करत असतो. माझ्या विधानसभा मतदारसंघातील एकही गाव रस्ता नाही असे नाही. प्रत्येक गावातील रस्ते चकाचक केली आहेत. देशात एक कमिटी नेमून त्यांनी माझ्या मतदारसंघाचा दौरा करावा. दौऱ्यामध्ये कोणती उणीव भासली किंवा त्यांनी मला पास नाही केलं तर मी निवडणुकीला उभारणार नाही. इतकी विकास कामे केली आहेत. असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपल्या मुला- मुलींना चांगले शिक्षण द्या असे ते म्हणाले. यावेळी के. डी. सी. सी बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, विकासाची गंगा आणणारे मंत्री म्हणून हसनसो मुश्रीफ यांची ओळख आहे. प्रत्येक घरा – घरात मुश्रीफ यांच्या माध्यमातून विविध योजना पोहोचल्या आहेत. यावेळी गोकुळ दूध संघ संघाचे संचालक युवराज पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर, प्रा. संग्राम तोडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बांधकाम कामगार साहित्याचे वाटप नामदार हसन मुश्रीफ, युवराज पाटील, भैय्या माने यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुनील कांबळे यांनी केले. कार्यक्रमास भगवान बुजरे, सरपंच छाया कुंभार, उपसरपंच उषा बारड, एम. के. संकपाळ, विजयराव जाधव, प्रभाकर हवालदार, बापू तोडकर, रणजीत संकपाळ, अरुण तोडकर, अनिल संकपाळ, सीमा तोडकर आदी. महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.