मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे विविध ठिकाणी ७५वा भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. सकाळी हुतात्मा तुकाराम चौक ध्वजारोहण श्री . संदिप संपतराव घार्गे ( प्रशासक तथा मुख्याधिकारी मुरगूड नगरपरिषद ) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
मुरगूड बाजारपेठ येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा ध्वजारोहण सकाळी ७ वाजून २५ मिनिटानी श्री . तानाजी नाधवडेकर (माजी सैनिक ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . तसेच हुतात्मा स्मारक येथिल ध्वजारोहण सकाळी ७ .३० वाजता श्री . सुभाष शंकर अनावकर, ( स्वातंत्र्य सैनिक वारसदार ) यांच्या शुभहस्ते , नगरपालिका कार्यालयासमोरील ध्वजारोहन सकाळी ७ .५०वा . श्री . प्रकाश रामचंद्र पोतदार , ( क . अभियंता मुरगूड नगरपरिषद ) यांच्या शुभहस्ते , समाजमंदिर ध्वजारोहण सकाळी ८ .०५ वा .श्री . मारुती महादेव शेट्टी ( लिपीक मुरगूड नगरपरिषद ) , कै . सुलोचनादेवी बालवाडी ध्वजारोहन सकाळी ८ .२०वा . श्री . चंद्रकांत धोंडीराम तिकोडे ( माजी सैनिक ),
तसेच श्री . लक्ष्मीनारायण पतसंस्था, गणेश नागरी पतसंस्था सर पिराजीराव घाटगे पतसंस्था , राजश्री शाहू पतसंस्था , अष्टविनायक पतसंस्था व इतर विविध संस्था , शाळा -कॉलेज , मुरगूड पोलिस स्टेशन, ज्येष्ठ नागरीक , हुतात्मा तुकाराम भारमल वाचनालय येथिल ध्वजारोहण डॉ . श्री . रमेश भोई . यांच्या शुभहस्ते तसेच विविध कार्यालय येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.