नोकरी

सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने भरती

कोल्हापूर, दि. 11 :  जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १ हजार ३८९ पदे रिक्त आहेत. शासन स्तरावरुन पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेमधून व खाजगी अनुदानित शाळेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षक जिल्हा परिषदेच्या अत्यावश्यक शाळांमध्ये प्रति महिना २० हजार रुपये मानधनावर कंत्राटी स्वरुपात नियुक्त करण्यात येणार आहेत.

त्यासाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे राहिल. अर्जाचा नमुना व नियुक्ती झाल्यानंतर द्यावयाचे बंधपत्र शिक्षण विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. इच्छुक व पात्र सेवानिवृत्त शिक्षकांनी शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *