गहिनीनाथ समाचारच्या बातमी ची दखल; गडहिंग्लज मध्ये भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू

गडहिंग्लज – धनंजय शेटके

Advertisements

काही दिवसापूर्वी गहिनीनाथ समाचार ने गडहिंग्लज मध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून नागरिक त्रस्त झाले आहेत अश्या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती.या बातमीची प्रशासनाने दखल घेतली असून शहरातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तर दुसरीकडे ह्या भटक्या कुत्र्यांनी नागरिक त्रासले होते.शहरातील विविध भागात या कुत्र्यांची संख्या मोठी असल्याने नागरिक भयभीत झाले होते.

Advertisements

या कुत्र्यांच्या मुळे अपघात सुद्धा झाले होते,तसेच हि कुत्री अंगावर धावून येण्याचे सुद्धा प्रकार घडत होते. हि भटकी कुत्री पकडण्या साठी पालिकेने पिंजरे आणले असून शहरातील विविध भागात कर्मचाऱ्यांच्या कडून कार्यवाही सुरू झाली आहे. अखेर पालिकेने हि भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!