
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगुड तालुका कागल येथील सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेली लक्ष्मी नारायण सहकारी पतसंस्था मर्यादित मुरगूड शाखा कूर यांच्या वतीने निळपण ता.भुदरगड येथील दहा शेतकऱ्यांना संस्था अध्यक्ष पुंडलीक डाफळे व जेष्ठ संचालक जवाहरलाल शहा यांच्या हस्ते नुकतेच ९७ लाख३०हजाराचे ट्रॅक्टर वितरण करण्यात आले.

यावेळी डाफळे यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी आढावा घेताना संस्थेच्या सभासदा करिता विविध योजना विषयी माहिती दिली यावेळी उपसभापती रवींद्र खराडे, संचालक जवाहर शहा, अनंत फर्नांडिस, दत्तात्रय तांबट, चंद्रकांत माळवदे, ( सर ) किशोर पोतदार, जगदीश देशपांडे, दत्तात्रय कांबळे, संचालिका सौ सविता सुतार, श्रीमती भारती कामत, मुख्य व्यवस्थापक नवनाथ डवरी,सचिव कूर शाखाधिकारी आर एन शीऊडकर यांच्यासह शेतकरी, सभासद , सेवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील , यांनी स्वागत अनंत फर्नांडिस यांनी तर आभार विनय पोतदार यांनी मानले