मुरगूडमध्ये-किरीट सोमय्यांना पुन्हा ‘नो एन्ट्री’, ठराव मंजूर

विरोधी पक्षनेते राहुल वंडकर यांची मागणी


मुरगूड ( शशी दरेकर ) :

Advertisements

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा चर्चेचा ठरणार आहे. याचे कारण म्हणजे मुरगूड नगरपालिकडून सोमय्यांच्या प्रवेश बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुरगूड नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा झाली. सभेदरम्यान झालेल्या ठरावात किरीट सोमय्यांना एन्ट्री द्यायची नाही, असा ठराव एकमताने मजूर करण्यात आला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या मुश्रीफांविरोधात तक्रार देण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत असून सोमय्यांचा नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ठराव मंजूर केला आहे.

Advertisements

दरम्यान, सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. पुढे महाविकास आघाडीने देखील आक्रमक होत सोमय्यांना कोल्हापुरात न जाता कराडमध्येच थांबवले. परंतु यावेळी कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे समर्थक आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता याच्याही पुढे जाऊन मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.
असा ठराव विरोधीपक्षनेते राहुल वंडकर यांनी केला व पत्रकारांशी बोलताना सांगितले की मुश्रीफ साहेब आमचे श्रावण बाळ आहेत
आशा व्यक्तीवर परप्रांती सोमय्या गोरगरीबांच्या श्रावन बाळावर आरोप करुन परत मुरगूड शहरात त्यांचा दौ-यावर आम्ही बहीशकार तर करणारच परंतु त्यांना गावात पाऊल ठेवू देणार नाही.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र परिट , नगरसेविका संगीता चौगुले
शहर अध्यक्ष रणजित सुर्यवंशी,महनतेश पाटील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!