बातमी

माजी आमदार राजे विक्रमसिंह घाटगे निस्वार्थी व दूरदृष्टीचे नेते होते – दगडू शेणवी

मुरगूड ( शशी दरेकर ) – माजी आमदार राजे विक्रमसिंह घाटगे
यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त ठाणेवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुलांना मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव साळुंखे होते.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी म्हणाले , राजे विक्रमसिंह घाटगे यांचे क्रीडा क्षेत्रावर अत्यंत प्रेम होते . म्हणूनच त्यांनी सुरु ठेवलेली शाहु साखर कारखाना मानधन कुस्ती स्पर्धा आजतागायत सुरू आहे .त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतच राजे समरजितसिंह घाटगे व सौ. नवोदिता घाटगे त्यांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत .यावेळी गजानन सावंत, स्वप्निल मोरबाळे , (अध्यक्ष युवा मोर्चा )अवचितवाडी जयवंत सावंत ( गुजरात पोलीस ), फौजी राजेंद्र सावंत, ठाणेवाडी ग्रामसेविका , उपाध्यक्ष प्रवीण सावंत, महादेव सुतार ,सदाशिव थोरवत ,गुरुदेव सावंत , निवृत्ती भक्ती ,संतोष चौगुले आदी उपस्थित होते .

ठाणेवाडी : विक्रमसिंह घाटगे यांच्या स्मृतिदिना निमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करताना दगडू शेणवी,गजानन सावंत, स्वप्निल मोरबाळे व अन्य
…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *