मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथिल सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ” सानिका स्पोर्टसच्या माध्यमातून व माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या पुढाकाराने ,अनेक विद्यार्थानां मदतीचा हात दिला जात आहे.
नुकताच मुरगूड शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनीनां केलेल्या आवाहनानुसार दोन विद्यार्थ्यानां संगणक कोर्स
( MS- cit ) प्रवेश देण्यात आला . त्या विद्यार्थाचा संपूर्ण खर्च सानिका -स्पोर्टस फौंडेशनने उचलून गरीब ,होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य केले आहे .
एक सामाजिक कर्तव्य या भावनेतून ते या माध्यमातून यथाशक्ती मदत करतात . अनेक विद्यार्थ्याना कमकुवत परिस्थीती असलेल्या मुलानां शैक्षणिक साहित्यांची मदत करणे , धार्मिक , सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्यात त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो .
मुरगूड येथिल ” माऊली कॅम्पुटर ” येथे त्यांचे ऍडमिशन केले . माऊली क्लासेसचे श्री . भरत पाटील सर यानी सानिका स्पोर्स्टचे अभिनंदन करून आपल्या मार्फत एक विद्यार्थिनिला मोफत अॅडमिशन देणार असल्याचे सांगितले .
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्री . दगडू शेणवी ., भरत पाटील सर , सेवानिवृत्त पोलिस निवास कदम , धोंडीराम परीट , सागर सापळे , सुशांत मांगोरे , सानिका स्पोर्ट _ फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते .