बातमी

खासगी आधार संच सुरु करण्यासाठी पात्र अर्जदारांनी 27 व 28 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे – निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव

कोल्हापूर, दि. 23 : स्वत:चे खासगी आधार संच असणाऱ्या अर्जदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीतील प्राथमिक स्वरुपात पात्र झालेल्या अर्जदारांनी दि. 27 व 28 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले आहे.

जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणामधील शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या स्वरुपात खासगी आधार संच सुरु करण्याची कार्यवाही  सुरु आहे. स्वत:चे खासगी आधार संच असणाऱ्या इच्छुक ग्रामपंचायत अथवा आपले सरकार सेवा केंद्रचालकांना अर्ज करण्यासाठी 10 डिसेंबर 2021 अंतिम मुदत दिली होती.

या कालावधीमध्ये एकूण 220 अर्ज प्राप्त झाले होते. संकेतस्थळावर उपलब्ध यादीतील अर्जदारांनी अर्जातील नमूद कागदपत्रांची मूळ प्रत, मूळ भाडे करारपत्र, आधार संच, आधार सुपरवायझर प्रमाणपत्र, दि. 1 जानेवारी 2020 ते दि. 30 सप्टेंबर 2021 या कालावधीमधील आपले सरकार केंद्राच्या कामकाजाचा MIS रिपोर्ट या कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *