बातमी

शिवसेनेचे विचार घराघरात पोहचवा : स्वप्नील महाडिक

कागल-गडहिंग्लज-उत्तुर विधानसभा मतदार संघात शिवसंपर्क अभियान दौरा

व्हनाळी (सागर लोहार) : कोल्हापूर जिल्हा हा महत्त्वाचा असून तालुक्यातील कुठलेही प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे,आज शिवसेनेचा एक आमदार येथे असला तरी भविष्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून येण्यासाठी शिवसेना पक्ष भक्कम करून शिवसेनेचे विचार घराघरात युवकांच्या मनामनात पोहचवा असे आवाहन शिवसेनेचे स्थानिय लोकाधिकार समिती,आय.आय.टी मुंबईचे, सरचिटनिस स्वप्नील महाडिक यांनी केले.

कागल-गडहिंगल्ज,उत्तुर विधानसभा मतदार संघात शिव संपर्क अभियान अंतर्गत भादवण ता.आजरा येथे आयोजित संपर्क दौ-यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे होते.

यावेळी कागल – गडहिंग्लज – उत्तुर विधानसभा मतदार संघातील वंदूर, सांगावं, कागल, व्हनाळी, केनवडे, भादवण, ऊत्तुर, धामणे, बहिरेवाडी, काडगाव, जरळेवाडी, शीपुर, करंबळी, हिरलगे, कौलगे, आमनापूर, इचनाळ, गडहिग्लज, या तालुक्यामंध्ये शिवसंपर्क अभियानाअंतर्गत संपर्क दौरा करण्यात आला. अभियानाच्या निमित्ताने स्थानिक समस्या जाणून घेतल्या जात असून जेष्ठ नागरिक, महिला तसेच युवकांशी संवाद साधून ठाकरे सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच मंडलिक साखर कारखाना, अन्नपुर्णा शुगर केनवडे कारखान्याला पदाधिका-यांनी भेटी दिल्या.

स्थानिय लोकाधिकार समिती आय,आय,टी मुंबईचे पदाधिकारी श्री.शरद वझे,श्री,राजन आगावणे उपस्थीत होते. कोल्हापूर संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पोवार, माजी आम.संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख अशोकराव पाटील, शिवगोंड पाटील, बाबुराव शेवाळे, अमृत पाठणकर, समिर देसाई, सरपंच संजय पाटील, सुनिल मुळिक, संदिप सुतार, पी. के. केसरकर, मारूती देसाई, मारूती आतरगी, सागर वाघरे, रणजित दिवेकर, किरण हाणभर, दिलिप फाळणेकर, सविता दिवेकर, मारूती तोरसे, पत्रकार सागर लोहार, आदी पदाधिकारी शिवसैनिक सक्रीय होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *