बातमी

विमानतळ विस्तारीकरणासाठी मौजे तामगांव जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया सुरु

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाठी मूल्यांकन निश्चिती झाल्यानंतर आज मौजे तामगांव( ता.करवीर) येथील गट नं. ९४१/ज या जमिनीतील क्षेत्र ०.२८.७५ हे. आर या जमीनीचे खरेदीखत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व संबंधित जमिनीचे मालक यांच्या दरम्यान दुय्यम निबंधक करवीर क्र. २ येथे झाले.

खरेदीवेळी जमीन मालकांना महाराष्ट्र विमानतळ कंपनीतर्फे ४८ लाख ५१ हजार ५६३ रुपये रक्कमेचा धनादेश  अदा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र विमानतळ कंपनीतर्फे अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, जमिनीचे मालक उमेश रामबिलास लाहोटी तसेच करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, नायब तहसिलदार (महसूल) विजय जाधव उपस्थित होते. 

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखालील दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीत विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेण्यात येत असून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणात या जमीनीच्या प्रथम खरेदीच्या रुपाने एक पाऊल पुढे पडले आहे. मौजे तामगांव येथील क्षेत्र ०.३४.७५ हे.आर. या जमीनीचे अंतिम मुल्यांकन निश्चितीबाबत दिनांक ९ मे २०२२ रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली व मूल्यांकन निश्चिती करण्यात आले.

मुडशिंगी येथील जमीन मालकांनी तात्काळ संमतीपत्रे जमा केली तर तात्काळ जिल्हास्तरीय समितीची बैठक घेवून जमीनीची मूल्यांकन निश्चिती लवकर होईल, जेणेकरून वाटाघाटीने थेट खरेदीची प्रक्रिया गतीने पार पडेल. याअनुषंगाने जमीन मालकांना करवीर उपविभागीय अधिकारी कार्यालयात गटागटाने बोलवून त्यांना कागदपत्रांबाबत उचित मार्गदर्शन करण्यात येत आहे.

One Reply to “विमानतळ विस्तारीकरणासाठी मौजे तामगांव जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *