गडहिंग्लज प्रांत कार्यालयाची जागा नगरपालिकेच्या नावे करण्यास तत्वता मान्यता

पालकमंत्री हसन मुश्रीफ व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या उपस्थितीत बैठक

गडहिंग्लज, दि.२७ : गडहिंग्लज शहरातील प्रांत कार्यालयाची जागा गडहिंग्लज नगरपालिकेला देण्यास मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता मिळाली. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  हसन मुश्रीफ आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

Advertisements

               पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी ही जागा नगरपालिकेच्या मालकीची असून ती नगरपालिकेला परत मिळण्याविषयीची गरज व्यक्त केली. महसूल मंत्री श्री. विखे -पाटील यांनी शासकीय कार्यपद्धतीनुसार हा तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

Advertisements

गडहिंग्लज नगरपालिकेच्या उत्पादनात पडणार भर

           याबाबत अधिक माहिती अशी, एकूण ४७ गुंठे जागेपैकी १७ गुंठे जागा १९५९ साली जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार प्रांत कार्यालयासाठी भाड्याने दिलेली होती. दरमहा १४३ रुपये भाड्यामध्ये देखभाल दुरुस्तीही नगरपालिकेकडेच होती. गेल्या ३१ वर्षापासून पत्रव्यवहार करूनही महसूल विभागाने नगरपालिकेला भाडेच अदा केले नव्हते. दरम्यान; नगरपालिकेचे व्यापारी संकुलासाठीचे आरक्षण असलेल्या या जागेवर महसूल विभागाने मालकी हक्कांमध्ये आपलेच लावून घेतले होते.  हे नाव नगरपालिकेने अपिलात जाऊन कमी केले. मुंबईत झालेल्या या निर्णयामुळे नगरपालिकेला व्यापारी संकुल अथवा व्यावसायिक गाळ्यांसाठी जागा उपलब्ध होणार आहे. साहजिकच नगरपालिकेचे उत्पन्न वाढणार आहे. दरम्यान; शहर विकासाच्या नवीन आराखड्यात प्रांत कार्यालयासाठी आजरा रोडवर दुसरी नवीन जागा आरक्षित केली आहे.

Advertisements
मुंबई : गडहिंग्लज  प्रांत कार्यालयाची जागा गडहिंग्लज नगरपालिकेला देण्यासंदर्भात मुंबईत पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. यावेळी शहरातील पदाधिकारी, नागरिक, नगर विकास व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

        या बैठकीला नगर विकास विभागाचे अवर सचिव वि.ना.धाईजे, महसूल विभागाचे उपसचिव श्री. कोटीकर,  निवासी जिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने,  गडहिंग्लजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, बसवराज खणगांवे, हारुण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, गुंडेराव पाटील, शहर अभियंता राजेंद्र गवळी, शहर नियोजन अधिकारी विशाल बेनक्याळे आदी प्रमुख उपस्थित होते.

4 thoughts on “गडहिंग्लज प्रांत कार्यालयाची जागा नगरपालिकेच्या नावे करण्यास तत्वता मान्यता”

Leave a Comment

error: Content is protected !!