बातमी

जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार मंडलिक यांनी शिंदे गटात सहभागी व्हावे

हमीदवाडा येथिल मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात निर्णय

मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही भूमिका हमिदवाडा कारखाना येथे झालेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत एक मुखाने घेण्यात आला. मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते.

जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मंडलिक गटाचा व्यापक मेळावा मंडलिक कारखाना कार्यस्थळावर झाला. त्यात उपस्थित सर्व प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी हात वर करून एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी रहावे असा निर्णय घेतला. मात्र अंतिम निर्णय खासदार संजय मंडलिक यांनीच घ्यावा .असा ठराव बैठकीत घेण्यात आला.

यावेळी वीरेंद्र मंडलिक बोलताना म्हणाले,कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्हाला काही निर्णय घ्यावा लागणार आहे . मंडलिक गटाच्या रिवाजाप्रमाणे कार्यकर्त्याला विचारल्या शिवाय कोणता निर्णय घेतला नाही. कार्यकर्त्याच्या शब्दाबाहेर कोणताच निर्णय घेत नाही. आमचे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर आजही प्रेम आहे आणि ते अखंडीत रहाणार आहे. कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार शासनाने खासदार फंडच नाही दिला तर दोन वर्षनी मतदारासमोर कसे जायचे

. कार्यकत्याचे हे म्हणणे आम्ही आजच खासदार संजय मंडलिक यांच्या कानावर घालतो . मग योग्य तो निर्णय खासदार मंडलिक जाहीर करतील.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक मुरगुड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले या मेळाव्यात सत्यजित पाटील (सोनाळी ) दत्ता कसलकर (हणबरवाडी ) सुधीर पाटोळे ( एकोंडी ) जयवंत पाटील (कुरुकली ) भगवान पाटील (बानगे )अनिल सिद्धेश्वर (कुरणी ) आनंदा फरकटे (फराकटेवाडी ) एन एस .चौगुले (सोनाळी ) माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके , आर डी पाटील (कुरुकली ) अतुल जोशी (कागल ) यांची भाषणे झाली.

मेळाव्याला कारखान्याचे व्हाईस चेअरमन बापूसो भोसले , जि प च्या महिला व बालकल्याण सभापती सौ शिवानीताई भोसले, बाजीराव गोधडे, रामचंद्र सांगले, केशवराव पाटील, शिवाजीराव इंगळे, जयसिंग भोसले, पांडूरंग भाट, एस व्ही चौगले, बालाजी फराकटे, दतात्रय मंडलिक, दिपक शिंदे आदी प्रमुखासह तालुक्यातील मंडलिक गटाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते आभार पंचायत समिती सदस्य विश्वास कुराडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *