बातमी

मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सह पतसंस्थेतर्फे सभासदाना भेटवस्तूंचे वाटप


मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथिल सर्वांच्या परिचयाची व विश्वासास पात्र ठरलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदाना खाद्यतेल, हरभरा डाळ, मोती साबण, सुहासिक तेल बॉटल अशा दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तूंचे सभासदानां वितरण करण्यात आले. तसेच संस्थेतील कर्मचा-यानां २५ टक्केप्रमाणे बोनसचे वितरण करण्यात आले. भेटवस्तू व बोनस वितरणाची माहिती संचालक श्री . संदीप कांबळे यानी दिली.

कार्यक्रमाच्या-प्रथम संस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर यानीं सर्वांचे स्वागत केले . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष मा . श्री . गजाननराव गंगापूरे हे होते. त्यानी आपल्या भाषणात श्री. व्यापारी नागरी सह . पतसंस्थेने केलेल्या प्रगतीचा उहापोह केला .सहकार क्षेत्रातील अनेक लहान-मोठया बाबी आपल्या भाषणातून कथन केल्या . दिवाळीपूर्वी सभासदानां भेटवस्तू वितरीत केल्याबद्दल संस्थेचे त्यानी तोंडभरून कौतूक केले.


त्यानंतर प्रास्ताविक संचालक श्री. प्रशांत शहा यानीं केले. ते म्हणाले २३ वर्षापूर्वी ही संस्था भाडेतत्वावर एका छोटाशा इमारतीत सुरू केली होती. मुरगूड पंचक्रोशितील तमाम जनतेच्या विश्वास असल्याने संस्था स्थापनेच्या पाहिल्या दिवशी सुमारे २७ लाख रु . च्या ठेवीचे संकलन झाले होते. त्यानंतर हळू-हळू संस्थेची प्रगती होत जाऊन बाजारपेठेमध्ये स्वमालकीची सुसज्य अशा इमारतीमध्ये संस्थेची पुढील प्रगतीची वाटचाल सुरू केली.

आता आपल्या संस्थेचे खास वैशिष्ठ म्हणजे सकाळी ११ वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत दोघे- तीघे संचालक हमखास संस्थेला भेट देऊन ग्राहकाशी संवाद साधून त्यांच्या काही अडी-अडचणी आहेत का ?, त्या समजावून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यास मदत करतात . तसेच संस्थेला भेट दिल्याने शिपाई , क्लार्क, कॅशिअर पासून पिग्मी एजंट आणि मॅनेजर पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना
सूचना दिल्या जातात त्यामुळे संस्थेचे काम तत्परतेने सुरू असते.
त्याचबरोबर येत्या २ वर्षात संस्थेचा रौप्यमहोत्सव येत आहे . त्यानिमित्य संपूर्ण वर्षभर ” रौप्य महोत्सव ” कशा पध्दतीने साजरा करावयाचा याबाबत सर्व संचालकांचा विचार -विनिमय सुरु आहे. सध्या संस्थेची स्वमालकीची इमारत आहेच ती सुसज्य अशी.आरसीसी बांधून बँकींग ऑफीस, मिटींग हॉल अशी एक भव्य वास्तू उभी करण्याचा मानस त्यानीं व्यक्त्त केला .
संस्थेकडे आजअखेर १७ कोटींच्या ठेवी, १२ कोटी ७५ लाखांचे कर्ज वितरण, एकूण गुंतवणूक ५ कोटी ८७ लाखांची केल्याचे व संस्थेच्या अहवाल सालात३१ लाखांचा नफा झाल्याची माहिती सांगितली. यावेळी सभासद श्री. अनिल मगदूम यानां नवीन वाहनाचे वितरण श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे संचालक श्री. पुंडलिक डाफळे यांच्या शुभहस्ते झाले.

या भेटवस्तू समारंभास संस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर व्हा. चेअरमन सौ. रोहिणी तांबट, संचालक सवश्री प्रशांत शहा , साताप्पा पाटील, किशोर पोतदार , नामदेवराव पाटील , शशीकांत दरेकर, हाजी धोंडीबा मकानदार, प्रदिप वेसणेकर, यशवंत परीट, प्रकाश सणगर, संदिप कांबळे, सुरेश जाधव, महादेव तांबट, संचालिका सौ. संगिता नेसरीकर, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर तसेच श्री. लक्ष्मीनारायण सह. पतसंस्थेचे चेअरमन श्री. अनंत फर्नांडिस, व्हा. चेअरमन श्री. विनय पोतदार, कार्यलक्षी संचालक श्री. नवनाथ डवरी, सभासद , नागरीकांसह व्यापारी नागरी पतसंस्थेचे सर्व सेवक वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री . चंद्रकांत माळवदे (सर) तर शेवटी आभार श्री. प्रकाश सणगर यानीं मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *