सेवक वृंदानांही १३ लाखावर बोनस
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी श्री .लक्ष्मीनारायण नारायण नागरी सह .पतसंस्थेच्या ३ हजार३०० सभासदानां सुमारे ४० लाखांच्या दिवाळी भेटवस्तू तसेच सेवकानां १३ लाखावर दिवाळी बोनस वितरणाचा कार्यक्रम मुरगूड येथे लक्ष्मीनारायणच्या मुख्य शाखेत सभापती श्री. अनंत फर्नांडीस, उपसभापती विनय पोतदार, जेष्ठ संचालक श्री. पुंडलिक डाफळे संचालक श्री. किशोर पोतदार , श्री. दत्तात्रय तांबट व अन्य संचालकांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सर्व सभासदानां प्रत्येकी ५ लिटर गोल्ड विनर खाद्यतेल कॅन व मोहक चे तूप १ किलो सभासद दिवाळी भेटवस्तू आणि संस्थेतील कायम व हंगामी अशा ५०सेवक वृंदानां पगाराच्या २५ टक्के बोनस वितरण करण्यात आले .याशिवाय गेल्या आर्थिक वर्षाच्या १ कोटी९७ लाख निव्वळ नफ्यावर सभासदानां१५ टक्के लाभांश वाटपापैकी २३ लाख२२हजार रुपयाचे वाटपही यावेळी करण्यात आले
अशा प्रकारे सभासद दिवाळी भेट वस्तू ( ४० लाख ) तसेच सेवक बोनस ( १३लाख ) व लाभांशपोटी ( २३ लाख२२ हजार असे एकूण सुमारे ७६ लाख४७ हजारावर वाटप करण्यात आले. या दिवाळी सभासद भेटवस्तू आणि बोनस कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री संस्थापक संचालक जवाहर शहा , पुंडलिक डाफळे , दत्तात्रय तांबट , रविंद्र खराडे , किशोर पोतदार , चंद्रकांत माळवदे ( सर ), रविंद्र सणगर, दत्तात्रय कांबळे , तज्ञ संचालक जगदिश देशपांडे , सौ . सुनिता शिंदे , सौ . सुजाता सुतार , श्रीमती भारती कामत , कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी, सचिव मारूती सणगर ,मुरगूडचे शाखाधिकारी सौ . मनिषा सुर्यवंशी,अंतर्गत तपासणीस श्रीकांत खोपडे यांच्यासह सर्व सेवक वृंद, सभासद मोठया संख्येने उपस्थित होते . सभासद भेटवस्तू व सेवकानां बोनस मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता .