बातमी

मुरगूडची सुवर्णमहोत्सवी ” श्री . लक्ष्मीनारायण ” नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचयाची असणारी सुवर्णमहोत्सवी ” श्री. लक्ष्मीनारायण ” नागरी सह. पतसंस्थेची सन२०२२ते २०२७ची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली . निवडणूक अधिकारी श्री. युसुफ अ . शेख सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कागल यानीं अशा आशयाचे पत्र संस्थेचे जनरल मॅनेजर श्री, नवनाथ डवरी यांचेकडे प्रदान केले.

आंतरराज्य आदर्श संस्था पुरस्कार

गेली ५६ वर्षे ग्रामिण अर्थकारणात कार्यरत असणाऱ्या या संस्थेला नुकताच चिक्कोडी ( कर्नाटक ) येथिल संस्थेतर्फे महाराष्ट्र , गोवा, कर्नाटक या राज्यांतर्गत दिला जाणारा ” आंतरराज्य आदर्श संस्था पुरस्कार ” देऊन गौरवण्यात आले आहे . मुरगूड येथिल मुख्य शाखेसह संस्थेच्या सावर्डे बु॥ , सेनापती कापशी ( ता. कागल ) ,कूर ( ता. भुदरगड ) , व सरवडे ( ‘ ता . राधानगरी ) येथे शाखा कार्यरत आहेत . संस्थेचे ३३१५ सभासद असून गेल्या सन२०२१-२२या आर्थिक वर्षात संस्थेच्या ३६७ कोटीवरील वार्षिक उलाढालीवर १ कोटी ९७ लाख असा विक्रमी निव्वळ नफा संस्थेला झाला आहे. संस्थेचे १०० कोटी ४८ लाखावरील खेळते भांडवल असून संस्थेकडे गेल्या अहवाल सालात ६३ कोटी ७० लाखावर ठेवी जमा आहेत . संस्थेने ४६ कोटी ४४ लाख ७५ हजारावर कर्जे वितरीत केली असून त्यापैकी सानेतारण २६ कोटी ६३ लाख २५ हजारावर कर्जे वितरीत केली आहेत . कर्जाची थकबाकी शून्य टक्के इतकी असून संस्थेला ऑडीट वर्ग ” अ ” प्राप्त झालेला आहे . संस्था स्वनिधी २ कोटी ४८ लाख इतका असून राखीव निधी २ कोटी ४२ लाख ९२ हजारावर आहे .

संस्थेने गेल्या अहवाल सालात २८ कोटी ३६ लाखावर सुरक्षित गुंतवणूक केली आहे. नूतन संचालक असे- सर्वसाधारण गट – सर्वश्री जवाहर मो. शहा, पुंडलीक ना. डाफळे , अनंत ब. फर्नांडीस, रविंद्र शि. खराडे , किशोर वि .पोतदार, दत्तात्रय रा . तांबट, विनय श .पोतदार , इतर मागास वर्ग गट -श्री. चंद्रकांत माळवदे ( सर ), अनुसुचित जाती / जमाती प्रतिनिधी – श्री. दत्तात्रय गुं. कांबळे, वि .जा. / भ .ज. / वि. मा. प्रवर्ग प्रतिनिधी – रविंद्र म. सणगर, महिला प्रतिनिधी – सौ . सुजाता प्र . सुतार , सौ . सुनिता सु . शिंदे, मुरगूडमधील सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेली व कार्यतप्तर संचालक आणि आपलेपणाने काम करणारे सर्वच -कर्मचारी यामुळेच संस्थेने गरुडभरारी घेतली आहे.

सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी संचालक , सभासद , ठेवीदार , कर्जदार , व-हितचिंतकांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *