बातमी

पिंपळगाव खुर्द येथे लोकवर्गणीतून भव्य कुस्तीचा आखाडा

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : पिंपळगाव खुर्द ता कागल येथे भव्य असे लोकवर्गणीतून कुस्तीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. गावच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात येतात त्यातील काही कार्यक्रम रद्द झाल्याने यात्रा कमिटीचे सहकार्य आणि कुस्ती सौकिनाकडून जमा झालेल्या लोकवर्गणीतून हा भव्य असा आखाडा तयार करण्यात आला आहे.

श्री बसवेश्वर जयंती निमित्ताने पिंपळगाव मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मात्र यंदा आचार संहिता असल्याने अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले.हे कार्यक्रम गावच्या लोकवर्गणीतून जमा होणाऱ्या आणि भाविका कडून मिळणाऱ्या रकमेतून ठेवले जातात. यावेळी यात्रे दरम्यान ठेवण्यात येणारे कार्यक्रम रद्द झाल्याने यात्रा कमिटी आणि गावातील नागरिका  कडून जमा झालेल्या लोकवर्गणीतून मिळालेल्या पैशाच्या माध्यमातून हे कुस्तीचे भव्य मैदान तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला.

आणि अवघ्या एका निरोपावरती गावातील अनेक व्यवसायिक आणि कुस्ती सौकिनांनी पुढे येत अवघ्या चार ते पाच दिवसात कुस्तीचा आखाडा उभा केला.

या मैदानावर आता एकाच वेळी अनेक कुस्त्या लावण्या इतपत मोठा हा आखाडा असल्याने भविष्यात ह्याचा वापर अनेक कुस्त्याच्या लढती भरविण्यासाठी देखील होऊ शकतो. सिद्धनेर्ली परिसतील हा भव्य असा आखाडा उभा केल्याने गावातील नागरिका कडून विशेषतः भागातील कुस्ती सौकिनाकडून अभिनंदनाचा वर्षाव तसेच ह्या विधायक कामाबाबत कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *